सांगोला तहसील कार्यालयात आतापर्यंत ९ लाख ७८ हजार ३५५ पानाच्या तपासणी; १० गावात सापडले ८७ कुणबी मराठा पुरावे
सांगोला - सांगोला तालुक्यातील १०२ गावातील सुमारे ९ लाख ७८ हजार ३५५ तपासणी केलेल्या कागदपत्रातील नोंदीत १० गावात आत्ता पर्यंत एकूण ८७ कुणबी मराठा, मराठा कुणबीचे उल्लेख असणारे अभिलेख (पुरावे) सापडले आहेत.
या व्यतिरिक्त शिक्षण विभाग, सांगोला नगरपालिकेकडे आणखी काही कुणबी मराठा, मराठा कुणबी पुरावे सापडले आहेत. तालुक्यातील सर्व अभिलेखे संपेपर्यंत पुरावे शोध मोहीम सुरूच राहणार असल्याचे तहसीलदार संतोष कणसे यांनी सांगितले.
मराठा समाजातील तपासणी चालू आहेत. सांगोला तालुक्यातील पाचेगाव खुर्द, बामणी, चिकमहूद, मेथवडे, राजापूर, वाढेगाव, डोंगर पाचेगाव, चोपडी, एखतपूर, वाटंबरे, मांजरी,
संगेवाडी आदी गावातील सुमारे ९ लाख ७८ हजार ३५५ पानाच्या तपासणी केलेल्या नोंदीत केवळ १० गावात ८७ नोंदी मराठा कुणबी, मराठा कुणबीचे उल्लेख असणारे अभिलेख ( पुराव) सापडले आहेत
दरम्यान सन १८८० ते१९२० या काळातील नोंदी व दस्तऐवज मोडी ( लिपीत ) भाषेत असल्यामुळे व कागदपत्र अत्यंत जीर्ण झाली असूनही कागदपत्राची व्यवस्थित हाताळणी करून मोडी लिपीतील
जाणकार सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक शामराव मारुती कांबळे व अँड. प्रज्ञा बाबा वाघमारे यांचेकडून कागदपत्राची तपासणी करून कुणबी मराठा, मराठा कुणबी पुरावे शोधण्याचे काम सुरू आहे.
चौकट
मागील एक महिन्यापासून सांगोला येथील अभिलेखा कार्यालयात नायब तहसीलदार, २ लिपिक, १० मंडल अधिकारी, ४२ तलाठी व १० कोतवाल असे ६५ अधिकारी कर्मचारी मिळून सन १९६७ पूर्वीचे महसुली अभिलेखामधील कडई पत्रक, जन्म मृत्यू नोंदणी, नमुना १४ तत्कालीन सातबारा / फेरफार व इनाम पत्रे, पीक पाहणी आदी दस्त ऐवजाच्या तपासणीत मोडी भाषेतील ८७ नोंदी कुणबी मराठा सापडल्या आहेत. मोडीतील जाणकाराच्या मदतीने सदर नोंदीचे भाषांतर करून संबंधित गावातील वंशावळ जुळून येणाऱ्या पात्र व्यक्तींना कुणबीचे प्रमाणपत्र देणार आहोत.
तहसीलदार संतोष कणसे


0 Comments