google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मा. आम, दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे एखतपुर - अजनाळे ( जुना नाझरे ) रस्ता दुरुस्तीसाठी ७० लाख निधी मंजूर : ग्रा. प. सदस्य दादासाहेब इंगोले एखतपुर गावातील नागरिकांनी मानले दीपकआबांचे आभार

Breaking News

मा. आम, दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे एखतपुर - अजनाळे ( जुना नाझरे ) रस्ता दुरुस्तीसाठी ७० लाख निधी मंजूर : ग्रा. प. सदस्य दादासाहेब इंगोले एखतपुर गावातील नागरिकांनी मानले दीपकआबांचे आभार

 मा. आम, दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे एखतपुर - अजनाळे ( जुना नाझरे ) रस्ता दुरुस्तीसाठी


७० लाख निधी मंजूर : ग्रा. प. सदस्य दादासाहेब इंगोले 
एखतपुर गावातील नागरिकांनी मानले दीपकआबांचे आभार

सांगोला / (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

एखतपुर ते अजनाळे गावाकडे जाणारा ( जुना नाझरे ) रस्ता दुरुस्तीसाठी मा. आम. दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे ७० लाख निधी मंजूर झाला आहे. यामुळे मागील अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी लागला असून, ग्रामस्थांकडून त्यांचे आभार मानले जात आहेत.

मागील काही दिवसा पूर्वी एखतपुर ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब विलासराव इंगोले यांनी एखतपुर ते अजनाळे गावाकडे जाणारा (जुना नाझरे ) रस्ता दुरुस्तीसाठी वेळो वेळी पाठपुरावा केला होता.

 पावसाळ्यात तर तो रस्ता नसून त्याचे वड्यातरूपांतर होत होते. व नागरिकांना जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती. काही वेळा तरी काही नागरिकांना रस्त्यावरील घसरगुंडीमुळे दुखापती झाल्या आहेत. 

या अनुषंगाने ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब इंगोले यांनी मा. आम. दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिली. व आबांकडे वेळोवेळी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न केला. 

व दीपकआबांनी या रस्त्यासाठी प्रथम प्राधान्य देऊन ७० लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याबद्दल एखतपुर गावातील नागरिकांनी दीपकआबांचे आभार मानले आहेत.

Post a Comment

0 Comments