google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक प्रकार..'बाप रे ! काय डेअरिंग म्हणायचे' ! अधिकाऱ्यांचीच घरे नेली धुऊन...!

Breaking News

धक्कादायक प्रकार..'बाप रे ! काय डेअरिंग म्हणायचे' ! अधिकाऱ्यांचीच घरे नेली धुऊन...!

 धक्कादायक प्रकार..'बाप रे ! काय डेअरिंग म्हणायचे' !  अधिकाऱ्यांचीच घरे नेली धुऊन...!


 चोरी करायची म्हणजे डेअरिंग पाहिजेच, पण हे जरी खरे असले तरी लातूर जिल्ह्यातील चोरट्यांचे डेअरिंग पाहून कुणाला घाम सुटला तर कुणाला धक्का बसला.

 त्याचे कारणही तसेच आहे. चोरट्यांनी बड्या बड्या अधिकाऱ्यांच्याच घरावर मोठा डल्ला मारला आहे. 

पोलीस कितीही जागरूक असले तरी, चोऱ्या होतच असतात. चोर सतत नवनव्या युक्त्या शोधून चोरी करतात आणि पोलिसांना हुलकावणी देण्याचा प्रयत्न करीत असतात.

 पोलीस देखील त्यांचा शोधण्यासाठी नवनव्या युक्त्या काढत राहतात. असा हा चोर पोलिसांचा खेळ अविरत सुरूच असतो. चोर घर, बंगले हेरून चोरी करतात हे माहित असते, शिवाय चोरमंडळी शक्यतो

 पोलिसांच्या वाट्याला जात नाहीत. अधूनमधून कधी पोलिसांच्या घरीही डल्ला मारतात पण हे क्वचित घडते. लातूर जिल्ह्यात मात्र चोरट्यांनी सगळ्यांच्याच नजरा आपल्याकडे वळवून घेतल्या आहेत.

 या अज्ञात चोरांनी बंगले हेरून चोरी केली पण त्यांनी हेरलेले बंगले पाहूननागरिक देखील तोंडात बोट घालू लागले आहेत. चोरट्यांनी एका शासकीय वसाहतीकडेच आपला मोर्चा वळवला आणि सामान्य कर्मचारी नव्हे

 तर, त्यांनी उप जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस उप निरीक्षक यांच्याच घरात घुसून हात मारला आहे. अन्य सहा कर्मचाऱ्यांच्या घरातही त्यांनी आपला प्रताप दाखवला आहे. 

चाकूर येथील तहसील कार्यालयाच्या जवळच शासकीय वसाहत आहे, या वसाहतीत शासकीय अधिकारी आणि कर्मचारी राहतात. या वसाहतीत शिरून चोरट्यांनी लाखो रुपयांचा माल लंपास केला.

 उप जिल्हाधिकारी यांच्यापासून पोलीस उप निरीक्षकांच्या घरापर्यंत आणि नंतर अन्य कर्मचारी यांच्या घरापर्यंत त्यांची मजल गेली आहे. या वसाहतीत चाळीस अधिकारी, कर्मचारी निवास करतात.

 सर्व सरकारी अधिकारी कार्म्ह्चारी असल्यामुळे त्यांना शनिवारी, रविवारी सुट्टी मिळते. साहजिकच त्यातील अनेकजण सुट्टी गाठून परगावी जात असतात.

 याचाच फायदा या चोरट्यांनी उठवला आणि अधिकारी, कर्मचारी यांची घरे धुवून नेली. या चोरट्यांनी चोरी करतानाही मोठी हुशारी दाखवली आहे.  ज्या घरांना बाहेरून कुलूप लावलेले दिसून आले नाही,

 त्या घरांना या चोरट्यांनी बाहेरून कड्या लावल्या. बाहेरून कुलूप नाही त्या अर्थी या घरातील लोक घरातच आहेत याचा अंदाज त्यांनी लावला आणि त्यांना त्यांच्याच घरात कोंडून ठेवले.

अधिकारी, कर्मचारी यांच्या घरातील सोने चांदीचे दागिने, रोख रक्कम लुटून चोरटे शिताफीने पसार देखील झाले. सकाळी हा प्रकार लक्षात आल्यावर एकच खळबळ उडाली. पोलिसांना याची माहिती देण्यात आली. 

पोलीस देखील तातडीने धावत या वसाहतीत आले. पोलीस अधिकारी राहत असलेल्या वसाहतीत पोलिसांचीही घरे फोडण्यात आल्याचा हा प्रकार पाहून अनेकांना धक्काच बसला. 

पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण  केले, चोरी झालेल्या घरांची पाहणी सुरु केली  मोठ्या अधिकाऱ्यांच्या आणि पोलिसांच्या घरीच चोऱ्या झाल्याने पोलिसांची इभ्रत भलतीच धोक्यात आली होती.

चोरीची माहिती ऐउन  आजूबाजूचे लोकही जमले, घटना ऐकून लोक हादरले तर होतेच पण अनेकांच्या तोंडून शब्द बाहेर आले, 'बाप रे ! काय डेअरिंग म्हणायचे' !

Post a Comment

0 Comments