google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आ.गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ कोळेगाव कडकडीत बंद.

Breaking News

आ.गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ कोळेगाव कडकडीत बंद.

  आ.गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ कोळेगाव कडकडीत बंद.



कोळे \( शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला वाहिद आतार )

 बहुजन समाजाचे नेते तथा विधानपरिषद आमदार श्री.गोपीचंद पडळकर यांच्यावर दि.२ डिसेंबर २०२३ रोजी इंदापूर या ठिकाणी काही समाज कंटकानी केलेल्या

 भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ कोळे ता.सांगोला येथे बहुजन समाजाच्या व कोळे ग्रामस्थ यांच्या वतीने सर्व गाव बंद ठेवून आंदोलन करण्यात आले. 

        दि.९ डिसेंबर रोजी इंदापूर येधील ओबीसी समाजाची सभा उरकून आ.गोपीचंद पडळकर हे शेतकरी बांधवांनी दूध दरवाढीसाठी उपोषण करणाऱ्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी जात असताना काही समाजकंटकांनी आम.गोपीचंद पडळकर यांच्यावर भ्याड हल्ला केला,

या निषेधार्थ दिनांक १२ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी दहा वाजले पासून सुमारे एक वाजेपर्यंत सर्व गाव कडकडीत बंद ठेवून झालेला भ्याड हल्ल्याच्या निषेध व्यक्त करण्यात आला.

बहुजन समाज व कोळे ग्रामस्थ यांच्या सयुंक्त वतीने गाव बंद ठेवण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.यावेळी आपात्कालीन अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या होत्या.सदर या आंदोलनास कोळे येथील बहुजन समाज व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments