google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अशोक कामटे संघटनेच्या मिरज रोड रेल्वे बोगदा बंद करण्याकरिता सर्व विभागांची संयुक्त बैठक संपन्न.बोगद्यातील कामामुळे पर्यायी बाह्यवळण रस्त्याने वाहतूक सुरळीत राहणार :-अशोक कामटे संघटना

Breaking News

अशोक कामटे संघटनेच्या मिरज रोड रेल्वे बोगदा बंद करण्याकरिता सर्व विभागांची संयुक्त बैठक संपन्न.बोगद्यातील कामामुळे पर्यायी बाह्यवळण रस्त्याने वाहतूक सुरळीत राहणार :-अशोक कामटे संघटना

 अशोक कामटे संघटनेच्या मिरज रोड रेल्वे बोगदा बंद करण्याकरिता सर्व विभागांची संयुक्त बैठक संपन्न.


बोगद्यातील कामामुळे पर्यायी बाह्यवळण  रस्त्याने वाहतूक सुरळीत राहणार :-अशोक कामटे संघटना

सांगोला (प्रतिनिधी) सांगोला शहरात असणारा मिरज रोड येथील बोगदा व महूद रेल्वे गेट येथील रेल्वे हद्दीतील असणारे काम शहरात कोणत्याही प्रकारची वाहतुकीची कोंडी अथवा गैरसोय न होता पूर्ण करण्याचे आश्वासन रेल्वे विभागातील अधिकाऱ्यांनी सांगोल्यातील बैठकीत दिले.

मिरज रेल्वे गेट भुयारी मार्ग क्रमांक 32 बंद करण्याबाबत व पर्यायी मार्गे वाहतुक सुरू करण्याबाबत  अशोक कामटे संघटनेसमवेत रेल्वे अधिकारी ,पोलीस प्रशासन, पीडब्ल्यूडी व नगरपालिका यांची घटनास्थळी

 पर्यायी मार्गाची पाहणी करण्यात आली व सकारात्मक चर्चा नुकतीच  संपन्न झाली. या कामानंतर पुढील टप्प्यात रेल्वे गेट क्रमांक 31 महूद रोड येथील कॉंक्रिटीकरण कामास सुरुवात होणार

 असल्याचे रेल्वे विभागातील अभियंता गणेश वाळके यांनी यावेळी सांगितले . वरील दोन्हीही कामे पूर्ण होण्याकरता शहरवासी यांचे पूर्णपणे सहकार्य राहणार 

असल्याचे अशोक कामटे संघटनेच्यावतीने सांगण्यात आले . सदरील बैठकीत पर्यायी मार्ग सुरू करण्याकरता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे

 अभियंता ,नगरपालिका अभियंता ,संभाजी ब्रिगेडचे अरविंद केदार ,राजू मगर व अशोक कामटे संघटनेचे पदाधिकारी त्यांच्या चर्चेतून पर्यायी मार्गांचा प्रश्न सुटून बोगद्यातील कामास लवकर सुरुवात होणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 या कामी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी शहरातील वाहनधारक व नागरिकांकरिता समन्वयाची भूमिका घेतल्यामुळे हा प्रश्न सुटण्यास खूप मोठी मदत होणार आहे .

Post a Comment

0 Comments