google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मराठा आरक्षणासाठी पंढरपूरपर्यंत 56 किमी पायी दिंडी, सांगोल्यातील पाचेगाव खुर्दच्या बांधवांचे पांडुरंगाला साकडे

Breaking News

मराठा आरक्षणासाठी पंढरपूरपर्यंत 56 किमी पायी दिंडी, सांगोल्यातील पाचेगाव खुर्दच्या बांधवांचे पांडुरंगाला साकडे

 मराठा आरक्षणासाठी पंढरपूरपर्यंत 56 किमी पायी दिंडी,


सांगोल्यातील पाचेगाव खुर्दच्या बांधवांचे पांडुरंगाला साकडे



 मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे यांनी आंदोलन सुरू केलं असून त्यांनी 24 डिसेंबरपर्यंत राज्य सरकारला मुदत दिली आहे.




 त्यांच्या या लढ्याला सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील पाचेगाव खुर्दच्या नागरिकांनी अनोख्या पद्धतीने पाठिंबा दिला.मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याच्या समर्थनार्थ मराठा समाजाकडून पाचेगांव खुर्द ते पंढरपूर अशा 56 किमी पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं.

या दिंडीच्या माध्यमातून पंढरपूर इथे मराठा आरक्षणासाठी पांडुरंगाला साकडं घालण्यात आलं. या वेळी गावातील सर्व वयोगटातील पुरूष आणि महिलांचा सहभाग होता.

विशेष म्हणजे या दिंडीत काही दिव्यांग मराठा बांधवांनी सहभाग घेतला आणि त्यांनी पांडुरंगाला साकडं घातलं.हा दिंडी सोहळा दोन दिवसांच्या होता. यावेळी आयोजकांच्या वतीने दिंडीतील सहभागी वारकऱ्यांसाठी नाश्ता, जेवणाची सोय आणि वैद्यकीय सुविधा पुरवण्यात आली होती.

मराठा आरक्षणाच्या मागणीला समर्थन मिळावं यासाठी सांगोल्यातील पाचेगाव खुर्द या ठिकाणी 1 डिसेंबरपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे.

या साखळी उपोषणामध्ये गावातील सर्व स्तरातील नागरिकांचा सहभाग आहे. महिला आणि मुलांनीही या उपोषणामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे.

Post a Comment

0 Comments