मोठी बातमी...पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नऊ वर्षात गोरगरिबांच्या हिताचं काम केलं -
चेतनसिंह केदार सावंत ८० कोटी लोकांना पंतप्रधान मोदींचे गिफ्ट, ५ वर्षे मोफत शिधा मिळणार
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (तालुका प्रतिनिधी): देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत गरिबांना पुढील पाच वर्षे मोफत रेशन देण्याची सर्वात मोठी घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेचा देशातील 80 कोटींहून अधिक लोकांना फायदा होणार आहे.
गरिबांच्या कल्याणासाठी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे- फडणवीस-पवार सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.गेल्या नऊ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोरगरिबांच्या हिताचं काम केलं असल्याचे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केले आहे.
यावेळी पत्रकारांशी बोलताना भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार म्हणाले, की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना दिवाळी गिफ्ट दिले आहे. पंतप्रधान मोदी यांनी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा कालावधी पाच वर्ष वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे गरीब कुटुंबियांना पुढील पाच वर्ष मोफत शिधा दिला जाणार आहे. देशातील सुमारे ८० कोटी नागरिकांना या योजनेचा लाभ होणार आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत गरीब कुटुंबाना मोफत शिधा दिला जातो.
कोरोना महामारीच्या काळामध्ये या योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तळागाळातील गोरगरीब माणसांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुर्धर आजारावरील औषधाच्या किंमती कमी करून सर्वसामान्य लोकांना उपचार स्वस्त केले आहेत. सर्वसामान्यांच्या आयुष्यात बदल घडवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
त्या दिशेने केंद्रातील आणि राज्यातील आरोग्य विभाग काम करत आहे. मोदी सरकार आरोग्य विभागात पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यावर भर देत आहे. कोरोना काळामध्ये आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते.
देशात लॉकडाऊन होता. अशावेळी गरिबांना दिलासा म्हणून त्यांना मोफत शिधा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी देशाचे हिताचे चांगले अनेक निर्णय घेतले आहेत.
तसेच भाजप पक्षाचं काम करीत असताना मोदींनी अनेकदा जिथं लोकांना गरज होती. तिथं जाऊन मदत केली आहे. गरिबीतून मुक्ती मिळणे आणि गरिबातील गरीब कुटुंबाला पुढे जाण्याची संधी मिळणे हाच खरा सामाजिक न्याय आहे,
याच धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या नऊ वर्षात गोरगरिबांच्या हिताचं काम केलं असल्याचे भाजपचे पंतप्रधानपदाचे चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगितले.
0 Comments