google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर पहा बातमी...

Breaking News

सांगोला तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर पहा बातमी...

 सांगोला तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर पहा बातमी...


खवासपूर ग्रामपंचायतीवर शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस, वाडेगांव ग्रामपंचायतीवर शिवसेना-शेकाप, | सावे ग्रामपंचायतीवर शेकाप तर चिकमहूद ग्रामपंचायतीवर आ. अॅड. शहाजीबापू पाटील गटाचा झेंडा फडकला

सांगोला / प्रतिनिधी : (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये खवासपूर ग्रामपंचायतीवर शेकाप- राष्ट्रवादी काँग्रेस, वादेगांव ग्रामपंचायतीवर शिवसेना-शेकाप, 

सावे ग्रामपंचायतीवर शेकाप तर चिकमहुद ग्रामपंचायतीवर आ. अॅड. शहाजीबापू पाटील गटाचा झेंडा फडकला आहे. चिकमहुद ग्रामपंचायतीत सरपंच

पदी शिवसेना शिंदे गट व आमदार शहाजी पाटील यांचे पुरस्कर्ते शोभा सुरेश कदम या विजयी झाले आहेत तर सदस्य पदाच्या १४ जागेसाठी निवडणूक होऊन

 त्यामध्ये १३ जागेवर आमदार शहाजी पाटील यांचे गटाचे तर एक जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळाली आहे विजयी सदस्य सर्वश्री नितीन सातपुते रखमा पारसे सुनीता हुबाले राजेंद्र कुमार भोसले सुनिता चव्हाण सविता जाधव 

दादासो महारनवर सोनाली सावंत दीक्षा कदम मारुती पारसे तुषार भोसले वंदना फडतरे कुंडलिक जाधव लक्ष्मी भोसले हे विजय झाले आहेत. सावे ग्रामपंचायतच्या निवडणुकीत सरपंच पदी शेकापचे शिवाजी शेजाळ गटाचे शिवाजी भैरू वाघमोडे हे विजय झाले आहे 

तर सदस्य पदी सर्वश्री तुषार गावडे स्वाती माने पांडुरंग शेळके संतोष माने सविता इमडे आनंदा बेहरे प्रियांका इमडे लताबाई पारसे समाधान इमडे रखमाबाई वाघमोडेसुजाता रेड्डी हे विजयी झाले आहेत खवासपूर ग्रामपंचायतच्या सरपंच पदी शेकाप व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गणेश वसंत दीक्षित हे विजयी झाले

 तर अकरा सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीत शेकाप व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दहा सदस्य तर एक सदस्य शिवसेना शिंदे गटाचे विजय झाले. विजयी सदस्य सर्वश्री अजित ऐवळे, भामाबाई गायकवाड, नामदेव यादव, रोहिणी गवळी, विमल जरे, वैभव ढेरे, भारत जरे, 

पल्लवी भोसले, धनश्री भोसले, आगतरावभोसले, मनीषा बोडरे हे विजयी झाले वाढेगाव ग्रामपंचायत च्या सरपंच पदी शेकाप व शिवसेनेच्या कोमल सुरेश डोईफोडे या विजयी झाल्या तर ग्रामपंचायतीत १३ सदस्य असून शेकापचे सात तर राष्ट्रवादीचे सहा सदस्य विजयी झाले आहेत

 विजयी उमेदवार सर्वश्री संगमेश्वर घोंगडे महादेव दिघे प्रतिभा भगत शिवाजी दिघे, स्नेहल हजारे, अलकाबाई दिघे, नंदकुमार दिघे, चंद्राबाई वसमळे, सागर ऐवळे शकुंतला दिघे, दत्तात्रेय शिंगारे,कविता खराडे हे विजयी झाले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेचा एक गटाला तेरा सदस्य पैकी सहा सदस्यावर समाधान मानावे लागले तर शेकाप शिवसेना शिंदे गटाचे सात सदस्य विजयी झाले

वाढेगाव येथे शिवसेना शिंदे गटातच दोन गट पडले होते त्यातील एक गट शेकाप बरोबर तर दुसरा गट राष्ट्रवादी बरोबर होता सरपंच पदासाठी शेकाप व शिवसेनेतर्फे कोमल सुरेश डोईफोडे तर राष्ट्रवादीतर्फे मैना संग्राम लवटे अशी लढत झाली त्यामध्ये शेकाप व शिवसेनेच्या कोमल डोईफोडे या विजयी झाल्या.

विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण फटाक्याची आतषबाजी करून आनंद उत्सव साजरा केला शेकापच्या सदस्याने मिरवणुकीने जाऊन गुलालाची उधळण करत शेकापचे नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला व डॉक्टर देशमुख यांनी विजयी उमेदवारांना भावी कार्यास शुभेच्छा दिल्या 

तसेच डॉक्टरबाबासाहेब देशमुख हे दिवंगत गणपतराव देशमुख यांच्या समाधी स्थळी जाऊन दर्शन घेतले तर चिकमहुद येथील विजय सदस्याने गुलालाची उधळण करून आम अॅड. शहाजीबापू पाटील यांचा आशीर्वाद घेतला. 

तालुक्यात चिणके येथे ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होऊन त्या ठिकाणी आमदार शहाजी पाटील गटांचे लतिका प्रकाश काटे या ३४ मतांनी विजयी झाल्या. उपविभागीय अधिकारी

समाधान घुटूकडे व तहसिलदार संतोष कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुक प्रक्रिया अतिशय नियोजन बध्द व सुरळीत पार पडली तसेच मंगळवेढा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड व

 कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे मतदानावेळी व मतमोजणीवेळी चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. निवडणुक प्रक्रिया अतिशय शांततेत पार पडली.

Post a Comment

0 Comments