google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 बाळासाहेबांची शिवसेना महिला आघाडी च्या जिल्हा उपाध्यक्षपदी राणी चव्हाण तर तालुका अध्यक्षपदी सिमा इंगवले-कोडग यांची निवड.

Breaking News

बाळासाहेबांची शिवसेना महिला आघाडी च्या जिल्हा उपाध्यक्षपदी राणी चव्हाण तर तालुका अध्यक्षपदी सिमा इंगवले-कोडग यांची निवड.

 बाळासाहेबांची शिवसेना महिला आघाडी च्या जिल्हा उपाध्यक्षपदी राणी चव्हाण


तर तालुका अध्यक्षपदी सिमा इंगवले-कोडग यांची निवड.

 (सांगोला/प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

काल सोमवार दि. 6 नोव्हेंबर रोजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या संपर्क कार्यालयामध्ये बोलवण्यात आलेल्या महिलांच्या बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष मुबिना ताई मुलानी यांनी जिल्हा उपाध्यक्ष म्हणून राणी चव्हाण यांची तर तालुका अध्यक्ष पदी सिमा इंगवले यांची निवड जाहीर केली.

 मागील अनेक दिवसापासून बाळासाहेबांची शिवसेना महिला आघाडी यांच्या तालुका पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या निवडी प्रलंबित होत्या. 

सदरच्या निवडीबाबत विचार विनिमय करण्यासाठी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष मोबीनाताई मुलानी यांनी बैठक आयोजित केली होती.

 सदरच्या बैठकीमध्ये मुबीना ताई मुलानी यांनी पदाधिकाऱ्यांची गरज, त्यांचे अधिकार व मर्यादा याबाबत विश्लेषण करून जिल्हा उपाध्यक्षपदी राणी चव्हाण व तालुका अध्यक्षपदी सीमा इंगवले यांची नियुक्ती करून त्यांना निवडपत्र देऊन त्यांचा सत्कार केला.

Post a Comment

0 Comments