सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना....सख्खा भाऊ पक्का वैरी!
जमिनीच्या वादातून मोठ्या भावाकडून मारहाण, बेदम मारहाणीत धाकल्या भावाचा अंत; मंगळवेढा तालुक्यातील घटना
मंगळवेढा :- जमिनीच्या वादातून भावांमध्ये झालेल्या भांडणाच्या वेळी मोठ्या भावाने केलेल्या मारहाणीत मधल्या भावाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
मारहाण प्रकरणी लहान भावासह त्याच्या पत्नीवर मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मृताच्या लहान भावाने तक्रार दिली आहे. शिवाजी बजरंग थोरबोले व सखुबाई शिवाजी थोरबोले (रा.रेड्डे ता.मंगळवेढा) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
नामदेव बजरंग थोरबोले (वय.50 रा.रेड्डे ता.मंगळवेढा) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या मोठ्या भावाचे नाव असून याप्रकरणी दिगंबर बजरंग थोरबोले (वय.42) यांनी फिर्याद दिली आहे.
ही घटना दि.5 नोव्हेंबर रोजी दुपारी 4.30 च्या सुमारास निंबोणी ते रेड्डे जाणारे रोडवर जगन्नाथ पाटील यांचे शेता जवळील मोबाईल टावर जवळ ता. मंगळवेढा येथे घडली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, वरील तारखेस वेळी व ठिकाणी वरील आरोपी यांनी शेताचे वाटणीचे कारणावरून भाऊ नामदेव बजरंग थोरबोले (वय 50 वर्ष राहणार रेड्डे तालुका मंगळवेढा) यास हाताने केलेल्या मारहाणीमुळे
शरीराचे अंतर्गत भागास मार लागल्याने त्यातच त्याचा मृत्यू झालेला आहे तसेच फिर्यादीस गळ्यास बोचकारले आहे म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी भादवी कलम 304,323,34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून या घटनेचा अधिक तपास पोसई शेख हे करीत आहेत.
0 Comments