प्रा. डॉ. किसन माने यांना जामखेड येथील मराठी साहित्य प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
सांगोला (प्रतिनिधी):- अहमदनगर (अहिल्यानगर ) जिल्ह्यातील जामखेड येथील मराठी साहित्य प्रतिष्ठानचे सन २०२२ चे राज्यस्तरीय ग्रंथ पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष, प्रसिद्ध लेखक प्रा. आ. व. पवार व संस्थेचे सचिव प्रा. डॉ. शत्रुघ्न कदम यांनी दिली आहे.
सदर प्रतिष्ठानच्या वतीने सांगोला येथील प्रा. डॉ. किसन माने यांच्या राजकीय मानदंड: भाई गणपतराव देशमुख या चरित्रग्रंथास महात्मा फुले राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
प्रा. डॉ. किसन माने हे डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोला येथे मराठी विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या राजकीय मानदंड भाई गणपतराव देशमुख या चरित्र ग्रंथाची दखल संपूर्ण महाराष्ट्रातून घेतली जात आहे.
स्वर्गीय आमदार डॉ. भाई गणपतराव देशमुख यांच्या जीवन कार्यावर विस्तृतपणे प्रकाश टाकणान्या या ग्रंथास आतापर्यंत मानाचे दोन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. व पाच पुरस्कार जाहीर झाले आहेत. यानिमित्ताने स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांचे कार्य या ग्रंथाच्या रूपाने महाराष्ट्रभर पोहोचत आहे.
ही विशेष आनंदाची बाब आहे.. या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, सन्मानचिन्ह, गौरवपत्र, शाल व श्रीफळ असे असून डिसेंबर २०२३ मध्ये सदर पुरस्काराचे वितरण होईल,
अशी माहिती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात व खजिनदार डॉ. जतीनबोस काजळे यांनी दिली आहे. या पुरस्कार निवड समितीत प्रा. डॉ. राजाराम सोनटक्के,
प्रा. डॉ. सुभाष देशमुख, प्रा. डॉ. गोपीनाथ बोडके, प्रा. विजया नलवडे यांनी काम पाहिले आहे. त्यांना हा मानाचा पुरस्कार मिळाल्याने शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
0 Comments