google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर जिल्ह्यातील १२६ ग्रामपंचायतींच्या उपसरपंच पदासाठी 'इतक्या' दिवसांत निवडणूक; जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्याकडून अधिसूचना जाहीर

Breaking News

सोलापूर जिल्ह्यातील १२६ ग्रामपंचायतींच्या उपसरपंच पदासाठी 'इतक्या' दिवसांत निवडणूक; जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्याकडून अधिसूचना जाहीर

 सोलापूर जिल्ह्यातील १२६ ग्रामपंचायतींच्या उपसरपंच पदासाठी 'इतक्या' दिवसांत निवडणूक;


जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्याकडून अधिसूचना जाहीर

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचे १०९ तर पोटनिवडणुकीचे १७ निकालांची अधिकृत घोषणा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी गुरुवारी अधिसूचना प्रसिद्ध करून केली.हे सदस्य अधिकृत झाले. 

ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. त्या ग्रामपंचायतींच्या उपसरपंच पदाची निवडणूक सात दिवसांत होणार आहे.याबाबत अधिकृत तारीख तालुका गटविकास अधिकारी आपल्या सोयीनुसार जाहीर करून उपसरपंच पद निवडणूक प्रक्रिया पार पाडतील.

ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पद हे थेट जनतेतून तर उपसरपंच पद निवडून आलेल्या सदस्यांमधून प्रत्यक्ष मतदान घेऊन निवडण्यात येणार आहे. ज्या ग्रामपंचायतीची मुदत अद्याप संपलेली नाही, त्याची उपसरपंच निवडणूक मुदत संपल्यावर घेण्यात येणार आहे, अशी माहिती मिळाली.

Post a Comment

0 Comments