google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर येथे पोलिसावर टेम्पो घालण्याचा प्रयत्न; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, लाखोंचा मुद्देमाल जप्त

Breaking News

सोलापूर येथे पोलिसावर टेम्पो घालण्याचा प्रयत्न; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, लाखोंचा मुद्देमाल जप्त

 सोलापूर येथे पोलिसावर टेम्पो घालण्याचा प्रयत्न; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, लाखोंचा मुद्देमाल जप्त


तिघा गोतस्करांनी पोलिस शिपायाच्या अंगावर टेम्पो घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तर सरकारी वाहनास धडक दिल्याने त्याचा दरवाजा तुटला. 

त्यानंतर टेम्पो सोडून त्यांनी पलायन केले.शुक्रवारी (ता. ११) सकाळी ६.४० च्या सुमारास गुरुनानक चौकातील तालुका पोलिस ठाण्याजवळील रद्दी डेपोसमोर ही घटना घडली.

 पोलिसांनी १६ देशी, पाच जर्सी गोवंश व टेम्पो असा सात लाखांचा मुद्देमाल जप्त केला. त्या तिघांविरुद्ध सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

समीर कय्युम कुरेशी (रा. कुरेशी गल्ली, सोलापूर), किरण बनसोडे, बाबू गेजगे (रा. भीम नगर, सांगोला, जि. सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. यातील फिर्यादी पोलिस कॉन्स्टेबल विठ्ठल चिदानंद काळजे यांनी टेम्पो (क्र. एम एच ११ एम ४७८९) थांबविण्यासाठी हाताने इशारा केला.

मात्र, चालक समीर याने टेम्पो काळजे यांच्या अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच टेम्पोने सरकारी वाहन क्रमांक (एम एच १३ टी डी ७१०२) ला पाठीमागील बाजुस धडक दिली. यात वाहनाचे पाठीमागील इंडिकेटर, दरवाजा तुटल्याने आर्थिक नुकसान झाले. 

त्यानंतर संशयित टेम्पो तेथेच सोडून पळून गेले. टेम्पोत १६ देशी व पाच जर्सी गोवंश होते. संशयितांनी क्रूरपणे दोरीने बांधले होते. ते कत्तलीसाठी शास्त्रीनगरकडे घेऊन निघाले होते.

गोसंरक्षक संघटनांकडून निषेध

याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गोवंशाच्या वाहतुकीसह जीवे मारण्याचा प्रयत्न करुन सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 

याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक सुनील अंकोलीकर तपास करीत आहेत. या घटनेचा गोसंरक्षक संघटनांनी निषेध केला असून आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments