google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राज्यस्तरीय नालंदा गौरव पुरस्कार २०२३ पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

Breaking News

राज्यस्तरीय नालंदा गौरव पुरस्कार २०२३ पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

 राज्यस्तरीय नालंदा गौरव पुरस्कार २०२३ पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन 


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

शिरभावी :-  महाराष्ट्र राज्यातील लोककल्याणासाठी सदैव तत्पर असलेले नालंदा ऑर्गनायझेशन, महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे यावर्षी “राज्यस्तरीय नालंदा गौरव पुरस्कार २०२३” चे आयोजन करण्यात आले आहे.

 मागील काही वर्षांपासून हे पुरस्कार देण्यात येत असून या ही वर्षी या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील गुणवंतांना

 “राज्यस्तरीय नालंदा गौरव पुरस्कार २०२३” देऊन सन्मानित करण्यात येणार आहे त्याकरिता महाराष्ट्र राज्यातील सामाजिक, साहित्य, कला, क्रीडा, शैक्षणिक, वैद्यकीय सेवा, सहकार, कामगार, पत्रकारिता, कृषी, राजकीय, पत्रकार, युवा महिला, 

आदर्श ग्रामपंचायत इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. वरील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि स्वयंसेवी संस्था यांच्या कार्याचा गौरव व्हावा

 तसेच या कार्याने प्रभावित होऊन इतर व्यक्ती, समाजसेवक, समाजसेविका व संस्थांना प्रेरणा मिळावी म्हणून नालंदा ऑर्गनायझेशन, महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे पुण्यातील जाहीर कार्यक्रमांमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत

 “राज्यस्तरीय नालंदा गौरव पुरस्कार २०२३” या पुरस्काराने  गौरविण्यात येणार आहे. यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.  कोणतीही अपेक्षा न ठेवणाऱ्या अनेक रत्नांचा शोध घेऊन त्यांना हे कार्य अधिक जोमाने करण्यासाठी प्रोत्साहित करता यावे

 या उद्देशाने हा पुरस्कार वितरण सोहळा दरवर्षी आयोजित केला जातो. पुरस्कार प्रेरणा देतात, प्रेरणेने राष्ट्र मोठे होते. याच विचारधारेने  पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे . 

तरी इच्छुकांनी  9503538606 / 9511859047 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन नालंदा ऑर्गनायझेशन, महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे करण्यात आले आहे.  पुणे येथे होणाऱ्या या “राज्यस्तरीय नालंदा गौरव पुरस्कार २०२३” पुरस्कारसाठी  अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहणार आहेत .

  तसेच त्यासाठीचे प्रस्ताव 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत पाठवावे तसेच जास्तीत जास्त मान्यवरांनी आपले प्रस्ताव पाठवून या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments