google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला येथील सौ. सुजाता विलास सोनलकर - आलदर यांचा सन्मान

Breaking News

सांगोला येथील सौ. सुजाता विलास सोनलकर - आलदर यांचा सन्मान

 सांगोला येथील सौ. सुजाता विलास सोनलकर -  आलदर यांचा सन्मान


प्रतिनिधी- सांगोला.समाधान मोरे पंचायत समिती येथे लेखनिक पदावर कार्यरत असलेल्या सौभाग्यवती सुजाता विलास सोनलकर -  आलदर यांना त्यांच्या

 विशेष सामाजिक सेवेतील कार्याबद्दल  सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. सोनलकर - आलदर मॅडम यांना सामाजिक सेवेची आवड आहे विविध वृद्धाश्रम, अनाथआश्रम इत्यादी ठिकाणी त्यांनी आर्थिक मदत केली आहे. 

त्याचबरोबर गोरगरीब गरजू असहाय्य लोकांना मदत करण्यासाठी त्या नेहमीच अग्रेसर असतात.  आपल्या कामाला त्या सेवा म्हणून पाहतात. आपल्या ऑफिसमध्ये आलेल्या गावाकडील अशिक्षित वयस्कर लोकांना त्या मदत करतात माझ्या परिघात सेवा  या समाजसेवी समूहाच्या त्या सदस्या आहेत.

 त्यांच्या या कार्याबद्दल सनमडी येथील माजी सैनिक पंढरीनाथ मोटे यांच्या आजी वैकुंठवासी बायजाबाई पांडुरंग मोटे प्रतिष्ठान सनमडी , मोटेवस्ती यांचे 

वतीने त्यांचा हा सन्मान करण्यात आला.बायजाबाई पांडुरंग मोटे यांच्या 51 व्या पुण्यस्मरणानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भजन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

 विविध अन्नदान व सामाजिक सेवांच्या माध्यमातून हा कार्यक्रम साजरा करण्यात आला याप्रसंगी संगीत शिक्षक दयानंद बनकर सर तसेच अतुल उकळे सर हे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments