google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक प्रकार..दिवाळी दिवशीच कर्नाटकात भयंकर हत्याकांड

Breaking News

धक्कादायक प्रकार..दिवाळी दिवशीच कर्नाटकात भयंकर हत्याकांड

धक्कादायक प्रकार..दिवाळी दिवशीच कर्नाटकात भयंकर हत्याकांड


कर्नाटकच्या उडुपी जिल्ह्यात आई आणि तीन मुलांसह एकाच घरातील चौघांची हत्या करण्यात आली आहे. उडुपी जिल्ह्यात एका महिलेची आणि तिच्या तीन

 मुलांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. काल ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारेकऱ्याने आधी महिला आणि तिच्या दोन मोठ्या मुलांची हत्या केली. 

तेवढ्यात महिलेचा 12 वर्षांचा धाकटा मुलगा आत आला. दरम्यान मारेकऱ्याने त्याला पाहताच त्याच्यावर हल्ला करून निष्पाप बालकाचाही चाकूने वार करून खून केला. मृताच्या शेजाऱ्याला आवाज आल्याने ते धाऊन गेले, 

मात्र मारेकऱ्याने त्यालाही धमकावले. मारेकऱ्यांनी महिलेच्या सासूवरही चाकूहल्ला केला, ज्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. 

सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबतची माहिती शेजाऱ्यांनी दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सर्व मृतदेह ताब्यात घेतले.

 प्राथमिक तपासात हे हत्याकांड पुर्व वैमनस्यातून झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. घरामध्ये कोणतीही चोरी झाली नाही किंवा कोणत्याही वस्तूला मारेकऱ्यांनी हात लावला नाही, त्यामुळे हे हत्याकांड वैयक्तिक कारणामुळे झाल्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments