google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग! राज्यात अवकाळी पाऊस शेतकऱ्यांना दिलासा! सांगोल्यात पहाटेपासून पावसाचे आगमन

Breaking News

ब्रेकिंग! राज्यात अवकाळी पाऊस शेतकऱ्यांना दिलासा! सांगोल्यात पहाटेपासून पावसाचे आगमन

 ब्रेकिंग! राज्यात अवकाळी पाऊस शेतकऱ्यांना दिलासा!


  सांगोल्यात पहाटेपासून पावसाचे आगमन

काही दिवसांपासून हवामान बदल झालेला दिसत आहे. राज्यासह देशात एकीकडे हवेतील गारवा वाढलेला जाणवत आहे. तर, दुसरीकडे महाराष्ट्रसह काही देशात काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती.

सोलापूर जिल्ह्यासह सांगोला तालुक्यात पावसाळा सुरुवात झाली आहे काल रात्रीपासून जिल्ह्यातील काही भागात विजेच्या कडकडासह पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सध्या तापमानाचा पारा घसरला असून राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. खरीप हंगामातील पीके काढणीला आल्याने शेतकऱ्याने शेती कामांना वेग दिला आहे. दरम्यान राज्यात अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले आहे.

 अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज पहाटेपासूनच सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे बळीराजाची चांगलीच तारांबळ उडाली.

 दरम्यान, येत्या २४ तासांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. शेतकऱ्यांनी खरीप पिकांची काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजनुसार, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. याचा परिणाम राज्यासह देशातील हवामानावर होत आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशातील काही भागात पुढील काही दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Post a Comment

0 Comments