google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक.. म्हसवड येथील घटना: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचे डोके भिंतीवर आपटून खून; पुढे काय केलं ते पहा ...

Breaking News

धक्कादायक.. म्हसवड येथील घटना: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचे डोके भिंतीवर आपटून खून; पुढे काय केलं ते पहा ...

 धक्कादायक.. म्हसवड येथील घटना: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचे


डोके भिंतीवर आपटून खून; पुढे काय केलं ते पहा ...

म्हसवड : चारित्र्याच्या संशयावरून दारूच्या नशेत पत्नीचे डोके भिंतीवर आपटून खून करण्यात आला. ही घटना म्हसवड येथे रविवारी घडली. याप्रकरणी म्हसवड पोलिस  ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पतीला अटक केली आहे. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, दीपाली धोंडीराम पुकळे (रा. कोडलकरवाडी, म्हसवड) हिचा विवाह धोंडीराम पुकळे (वय ४०, पुकळेवाडी, ता. माण) याच्याबरोबर झाला होता.

 धोंडीराम व पत्नी दीपाली हे म्हसवड येथील सहकारनगर परिसरात एका इमारतीत खोली भाड्याने घेऊन राहत होते. दीपाली ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होती. दीपाली व धोंडीराम यांना ८ व ९ वर्षांची अशी दोन मुले आहेत. 

धोंडिराम शनिवारी रात्री दारू पिऊन आला. दीपाली हिच्या चारित्र्याच्या संशयावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. 

या भांडणात धोंडीराम याने दीपालीचे डोके भिंतीवर व जमिनीवर आपटले. यामध्ये दीपालीच्या कानातून व नाकातून रक्तस्त्राव सुरू झाला. त्यानंतर तिला बेडवर झोपवले. मुलांना जवळ घेऊन मुले झोपवली.

धोंडिराम स्वत:ही रात्रभर दीपालीजवळ बसून होता. सकाळी मुले उठल्यानंतर धोंडीरामनेच चहा-बिस्किटे दिली.

 मुले आईला उठवत असताना रोज भांडणे झाल्यावर रागा रागाने आई झोपते त्याप्रमाणे झोपली असेल असे मुलांना वाटले. त्यानंतर अकराच्या सुमारास मुलांना बाहेर खेळाला पाठविले. धोंडिरामही दुपारी दोनच्या दरम्यान घराबाहेर गेला.

त्यावेळी घरी आलेल्या मुलांनी आईला उठवण्याचा प्रयत्न केला; मात्र आई उठत नाही म्हणून रडू लागली. यामुळे शेजारी राहणारे लोक तेथे आले. त्यांनी पाहिले तर दीपालीचा श्वास बंद पडला होता. याबाबत कोडलकरवाडीच्या तिच्या आई-वडिलांना माहिती देताच ते घटनास्थळी आले. 

दरम्यान, खुनानंतर धोंडिराम हा खून करून एका ठिकाणी दडून बसला होता. पोलिसांनी शिताफीने धोंडीरामला पत्नी दीपाली हिचा खून केल्याप्रकरणी ताब्यात घेतले. 

उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments