तालुका विधी सेवा समिती सांगोला व विधीज्ञ संघ सांगोला यांचे संयुक्त
विदयमाने घेरडी येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर व फिरते लोकन्यायालय संपन्न
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (प्रतिनिधी): तालुका विधी सेवा समिती सांगोला व विधिज्ञ संघ सांगोला यांचे संयुक्त विदयमाने घेरडी येथे कायदेविषयक शिबीर व फिरते लोकन्यायालय संपन्न झाले. शनिवार दिनांक ४ नोहेंबर रोजी पेरडी वेये विक शिवीर आयोजित केले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. विश्वास गायकवाड यांनी करून शिबीराबददल माहीती दिली. कार्यक्रमाचे सुरुवातीस बालहक्क या विषयावर अॅड. सौ. बोठे यांनी माहीती दिली.
यावेळी अॅड. सौ. घोंगडे यांनी सायबर क्राइम यावर मार्गदर्शन केले. ज्येष्ठ विधीज्ञ अयुब पटेल यांनी ज्येष्ठ नागरीक कायदा या विषयावर उदाहरणासह माहीती दिली.
कायदेविषयक मार्गदर्शन शिबीराचे महत्व सांगताना सांगोला न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश श्री. एस.एम. घुगे साहेब यांनी नागरीकांचे हक्क व अधिकार विषद करून वाद व निवारण याबाबत माहीती देवुन मार्गदर्शन केले.
फिरते लोकन्यायालयाचे महत्व विषद करून याचा लाभ जास्तीत जास्त पक्षकारांनी घ्यावा असे आवाहन मुख्य न्यायाधिश श्री. संजय घुगे साहेब यांनी केले.
यावेळी सांगोला न्यायालयाचे दुसरे सह दिवाणी न्यायाधिश श्रीमती के. बी. सोनवणे मॅडम उपस्थित होते. कार्यकगावे सुखसंचालन विधिज्ञ संघाचे उपाध्यक्ष अॅड. दहयाप्पा आलदर यांनी केले व आभार प्रदर्शन घेरडी ग्रामपंचायतचे सरपंच सौ. सुरेखा पुकळे यांनी केले.
कायदेविषयक शिबीरानंतर घेरडी येथे फिरते लोकन्यायालयाचे आजोजन करणेत आले होते. पॅनल प्रमुख म्हणुन दुसरे सह दिवाणी
न्यायाधिश श्रीमती के. बी. सोनवणे मॅडम यांनी व पॅनल सदस्य म्हणुन अॅड. सौ. बोते यांनी काम पाहीले. यावेळी बहुसंख्येनी दिवाणी व फौजदारी प्रकरणे निकाली झाले.
घेरडी येथील कायदेविषयक शिबीरात नागरीकांनी मोठया उत्साहात सहभाग घेतला यावेळी सांगोला विधीज्ञ संघाचे अध्यक्ष अॅड. दत्तात्रय घाडगे व पदाधिकारी तसेच तज्ञ विधीज्ञ, पंचायत समितीचे सहायक गट विकास
अधिकारी मिलींद सावंत, पी.एस.आय. श्रीमती रूपाली उबाळे, घेरडी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सदस्य व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होणेकरीता न्यायालयीन कर्मचारी व तालुका विधी सेवा समितीचे कर्मचारी यांनी विशेष परीश्रम घेतले.
0 Comments