प्रशासनाने पारदर्शकपणे अर्जाची छाननी प्रक्रिया पार पाडावी : सुरजदादा बनसोडे
सांगोला/(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी गावातील उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी तोबा गर्दी केली होती. सरपंच पदासाठी आणि सदस्य पदासाठी देखील मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाल्याने अर्ज भरलेल्या उमेदवारांना अर्ज माघार घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनधरणी सुरू आहे.
गाव पातळीवर प्रस्थापित पुढारी सर्वसामान्य उमेदवारांना अर्ज माघारी घेण्यासाठी आपल्या दबाव तंत्राचा वापर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा पद्धतीच्या घटना घडू नये
यासाठी संबंधित पोलीस प्रशासनाने तसेच अर्ज माघार घेण्याच्या कार्यालयामध्ये संबंधित प्रशासनाने पारदर्शकपणे अर्जाची छाननी प्रक्रिया पार पाडावी अशी मागणी रिपब्लिकन पॅंथर ऑफ इंडिया सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरजदादा बनसोडे यांच्या वतीने करण्यात आली आहे.
सांगोला तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक तर तीन ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका सुरू आहेत. यामध्ये चिकमहूद(ता.सांगोला) येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
गेली निवडणुक बिनविरोध करण्यात आम. शहाजीबापू पाटील यांना यश आले होते.परंतु आता सरपंच पदासाठी इच्छुकांची गर्दी वाढताना दिसत आहे.सरपंच पदाच्या एका जागेसाठी एकूण २१अर्ज दाखल झाले आहेत.
तर सदस्य पदासाठी एकूण १०७ अर्ज दाखल झाले आहेत. यामुळे यंदा आम. शहाजीबापू पाटील यांना ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यात यश मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
या निवडणुकीची अर्ज छाननी दि.२३ रोजी सकाळपासून होणार आहे. दरम्यान आम. शहाजीबापू पाटील यांच्या गावची ही निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. या निवडणुकीमध्ये सर्वच उमेदवार व गाव पुढाऱ्यांनी चांगली कंबर कसलेली दिसतं आहे.
कोण अर्ज ठेवणार आणि निवडणूक रिंगणात कोण उभा राहणार यासंदर्भात दिवस रात्र एक करून गाव पुढारी आपल्याच पक्षाचा उमेदवार रिंगणात उभा राहणार आणि निवडून येण्यावर अधिक भर दिला जात आहे.
यामध्ये समोरील उमेदवाराकडून अर्ज माघारी घेण्यासाठी काही ठिकाणी मनधरनी तर काही ठिकाणी आपल्या राजकीय दबाव तंत्राचा वापर करून प्रतिस्पर्धी उमेदवारांचे अर्ज अवैध करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यामध्ये आज होणाऱ्या अर्ज छाननी मध्ये अधिकाऱ्यांनी अत्यंत पारदर्शकपणे अर्जाची छाननी करावी. अधिकाऱ्यांवरती अर्ज बाद करण्यासाठी दबाव तंत्राचा वापर केला जाऊ शकतो तरी अधिकाऱ्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता अत्यंत पारदर्शकपणे अर्जाची छाननी करावी.
छाननी प्रक्रियेत काही अनुचित प्रकार घडल्यास संबंधित प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देखील रिपब्लिकन पॅंथर ऑफ इंडिया सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरजदादा बनसोडे यांच्या वतीने देण्यात आला आहे.


0 Comments