google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक घटना....साहेबांच्या गाडीसह १ कोटी घेऊन चालक फरार, मोबईल फेकला, लोकेशन बदललं, पण…

Breaking News

खळबळजनक घटना....साहेबांच्या गाडीसह १ कोटी घेऊन चालक फरार, मोबईल फेकला, लोकेशन बदललं, पण…

खळबळजनक घटना....साहेबांच्या गाडीसह १ कोटी


घेऊन चालक फरार, मोबईल फेकला, लोकेशन बदललं, पण…

१७ वर्षांपासून विकासकासाठी काम करणाऱ्या चालकाला अकोल्यातून अटक करण्यात आली आहे. हा चालक त्याच्या मालकाचे १.०६ कोटी रुपये घेऊन पळून गेला होता. पोलिसांनी सांगितले 

की, आरोपी संतोष चव्हाण याने आपला मोबाईल फोन बंद केला होता, तर लोकेशन कळू नये म्हणून तो वेगवेगळी वाहनंही बदलत होता. त्यामुळे तो सीसीटीव्हीपासूनही वाचत राहिला.

ही चोरी ११ ऑक्टोबर रोजी झाली होती. विकासक सरकारी कार्यालयात जात होता आणि त्याच्या कारच्या बूटमध्ये २५ लाख रुपये ठेवले होते. त्यांनी चव्हाणला पैशांबाबत सांगितले

 आणि गाडीत बसण्यास सांगितले. मात्र, अर्ध्या तासाने ते परत आले असता चव्हाण रोख रक्कम आणि कार घेऊन गायब झाला होता.

 त्याचा फोन बंद होता. चव्हाण यांनी बिल्डरच्या कार्यालयातून आणखी ७५ लाख रुपयांची चोरी केल्याचंही पोलिसांनी सांगितले.

कार घेऊन फरार झाल्यानंतर चव्हाणने जोगेश्वरी येथे कार सोडली आणि ऑटोरिक्षा केली. तेथून तो हब मॉल, गोरेगाव येथे गेला,

 या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते.पोलिसांच्या पथकाने त्याच्या घणसोलीतील घरी भेट दिली, मात्र तो तिथे नव्हता. तपासात पोलिसांना कळाले की,

 त्याच्या पत्नीने त्याच्या मुलाला शाळेतून लवकर घेतले होते. तसेच, त्याच्या मोबाईल नंबरचा वापर करून कोणतेही कॉल केले गेले नव्हते, त्यामुळे त्याने तो बंद करुन मोबाईल टाकून दिल्याचं समजते, असं एका अधिकाऱ्याने सांगितले.

Post a Comment

0 Comments