खळबळजनक! सोलापूर जिल्ह्यातील 'या' ग्रामपंचायतींनी केला ठराव मराठा
आरक्षण मिळेपर्यंत नेत्यांना गावामध्ये नो एंट्री, मतदानावर बहिष्कार;
मराठा समाजाला सरसकट कुणबी मराठा प्रमाणपत्र जोपर्यंत दिले जात नाही, तोपर्यंत माढा तालुक्यातील लव्हे आणि वडाचीवाडी या दोन्ही
ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी मतदानावरील बहिष्काराचा ठराव केला आहे. तसेच सर्वच राजकीय पक्षांतील नेते मंडळींना गावांमध्ये प्रवेश बंदीचा निर्णय घेतला आहे.
तालुक्यात प्रथम बारलोणी ग्रामपंचायतीने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या अन्यथा निवडणुकांवर बहिष्कार व नेत्यांना गाव बंदीचा ठराव मंजूर केला.
त्याचबरोबर गावामध्ये सर्व पक्षाच्या नेते व पुढारी यांना राजकीय सभानां बंदीचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. बैठकीस सरपंच नवनाथ गपाटे व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
याबाबत येणाऱ्या काही दिवसातच बारलोणीत गावाच्या वेशी समोर आगामी निवडणुका, मतदान बहिष्कार व सर्वपक्षीय नेत्यामंडळींना गाव बंदी असल्याचा मोठा फलक लावण्यात येणार असल्याचे जाहिर केले.
माढा तालुक्यातील भोसरे ग्रामपंचायत ने देखील ओबीसी प्रवर्गामधून मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्या अशी मागणी करत पुढाऱ्यांना गाव बंदीचा आणि निवडणुकांवर बहिष्काराचा ठराव घेण्यात आला.


0 Comments