सांगोला तालुक्यात खून प्रकरणातील आरोपी जेरबंद लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून केला होता खून
सांगोला, शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क. सांगोला तालुक्यातील इराचीवाडी येथील १८ वर्षीय घटस्फोटित महिलेच्या खून प्रकरणातील फरार संशयित आरोपी सचिन मारुती गडदे (वय २३, रा. गौडवाडी,
ता. सांगोला) यास सांगोला पोलिसांनी अत्यंत शिताफीने आरग (ता. मिरज) येथून ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी, इराचीवाडी (कोळा) ता. सांगोला येथील ऋतुजा मदने ही लग्नास तयार नसल्याचा राग मनात
धरून सचिन गडदे याने दि. १६ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी सात ते सव्वा सात वाजण्याच्या दरम्यान ऋतुजा मदने हिच्या वस्तीवर जावून लोखंडी धारधार कोयत्याने ऋतुजा हिच्या गळ्यावर,
हातावर, खुब्यावर, डोक्यात व पाठीवर वार करुन गंभीर जखमी करून तिचा खुन केला, म्हणून सचिन गडदे याच्याविरोधात सांगोला पोलीसात खुनाचा गुन्हा दाखल केला होता..चार पथके तैनात
आरोपी सचिन गडदे हा ऋतुजा मदने हिचा खून करून फरार झाला होता. आरोपीचा शोध घेण्याकरीता सांगोला पोलिसांनी चार पथके नेमली होती.
संशयित हा आरग येथे 'श्री संत बाळू मामा' यांच्या बग्गा नंबर ५ मधील मेंढरामध्ये असल्याची माहिती गोपनीय बातमीदारांमार्फत पोलिसांना मिळाली होती.
गडदे हा 'श्री संत बाळू मामा' रथाच्या पाठीमागील असणाऱ्या पालामध्ये झोपलेला आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केले असता गडदे याला पोलीस कोठडी सुनावली
0 Comments