मोठी बातमी...सांगोल्यातील भाजप पदाधिकारी निवडी लवकर होतील : चंद्रशेखर बावनकुळे
सांगोला तालुक्यातील प्रलंबित भाजप तालुकाध्यक्षांसह पदाधिकारी, कार्यकारिणीच्या निवड़ी लवकरात लवकर केल्या जाणार
असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगोल्यातील भाजपच्या शिष्टमंडळास दिले. सांगोला येथील भाजप ज्येष्ठ नेते
शिवाजीराव गायकवाड, माजी नगराध्यक्ष नवनाथ पवार, माजी जि. प. सदस्य अतुल पवार, भाजप जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ भोसले, माजी तालुकाध्यक्ष संजय गंभीरे, माजी सरपंच प्रवीण नवले,
माजी उपसरपंच सचिन जाधव यांच्या शिष्टमंडळाने तासगाव येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील,विधानपरिषद सदस्य आमदार
गोपीचंद पडळकर, अमरसिंह देशमुख, सांगली भाजप जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, उपाध्यक्ष सत्यजित देशमुख यांची भेट घेतली.
शिष्टमंडळाने प्रलंबित सांगोला येथील असणाऱ्या तालुकाध्यक्ष,उपाध्यक्ष पदाधिकारी निवडी तसेचसांगोला येथील भाजपच्या शिष्टमंडळाने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची तासगाव येथे भेट घेऊन निवेदन दिले.
यावेळी शिवाजीराव गायकवाड, नवनाथ पवार, अतुल पवार, नवनाथ भोसले उपस्थित होते.नगरपालिका हद्दीतील विविध
तालुक्यातील विविध विकासकामे, अडचणी, समस्या तसेच सांगोला विकासकामे प्रश्न, अडीअडचणी विविध विषयांवर चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात निवेदन दिले. निवेदनावर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी प्रतिसाद दिला.
0 Comments