google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज....जिल्हाध्यक्ष निवडीनंतर मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव शनिवारी दिवसभर जवळ्यात शुभेच्छा देण्यासाठी हजारो कार्यकर्त्यांची रीघ

Breaking News

ब्रेकिंग न्यूज....जिल्हाध्यक्ष निवडीनंतर मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव शनिवारी दिवसभर जवळ्यात शुभेच्छा देण्यासाठी हजारो कार्यकर्त्यांची रीघ

 ब्रेकिंग न्यूज....जिल्हाध्यक्ष निवडीनंतर मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील


यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव शनिवारी दिवसभर जवळ्यात शुभेच्छा देण्यासाठी हजारो कार्यकर्त्यांची रीघ 

सांगोला :-(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी नुकतीच मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर संपूर्ण जिल्ह्यासह सांगोला तालुक्यातून त्यांच्यावर शुभेच्छा आणि अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला आहे.

 शनिवार दि १४ रोजी स ८.०० पासून दिवसभर जवळा ता. सांगोला येथील आबांच्या घरी हजारो कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी रीघ लावली होती. 

गुरुवार दि १२ रोजी जिल्हाध्यक्ष पदी मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मुंबई येथील पक्षाच्या कार्यालयात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सुचनेनुसार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी

 नियुक्ती पत्र देऊन त्यांची जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. यानंतर शनिवारी प्रथमच मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील जवळा येथील आपल्या निवासस्थानी आले होते हे समजताच कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून दिपकआबांनी यापूर्वी ८ वर्षे काम पाहिले आहे. त्यामुळे जिल्ह्यात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाचा प्रतिनीधी म्हणून विधान परिषदेत प्रतिनिधित्व केल्याने जिल्ह्यात त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे.

 शिवाय जिल्हा अध्यक्ष पदावर सांगोला तालुक्यातील व्यक्तीला काम करण्याची पुन्हा संधी मिळाल्याने संपूर्ण सांगोला तालुक्यातील कार्यकर्ते आणि नागरिकांनी दिवसभर गर्दी केली होती. यावेळी सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि प्रशासकीय क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक मान्यवरांनी भेटून दिपकआबांना शुभेच्छा दिल्या. 

चौकट 

१) सोलापूर जिल्ह्याला राज्यात राष्ट्रवादीचा "रोल मॉडेल" बनवणार...!! 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटनेत काम करण्याचा आपल्याला अनेक वर्षांचा अनुभव आहे. जिल्हा अध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष, पक्ष निरीक्षक आणि लोकसभा निवडणुकीत प्रचार प्रमुख अशा विविध पदांवर काम पाहिले आहे.

 ज्या विश्वासाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पुन्हा जिल्हाध्यक्ष पदावर काम करण्याची संधी दिली आहे. संघटनेच्या कामात सोलापूर जिल्ह्याला राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा रोल मॉडेल बनवून वरिष्ठांचा विश्वास सार्थ ठरवणार.

मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील

जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर

Post a Comment

0 Comments