google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी...सांगोल्याचे पाणीदार आमदार शहाजीबापू पाटील यांचा वाढदिवस जोशपूर्ण वातावरणात संपन्न

Breaking News

मोठी बातमी...सांगोल्याचे पाणीदार आमदार शहाजीबापू पाटील यांचा वाढदिवस जोशपूर्ण वातावरणात संपन्न

मोठी बातमी...


सांगोल्याचे पाणीदार आमदार शहाजीबापू पाटील
यांचा वाढदिवस जोशपूर्ण वातावरणात संपन्न

सांगोला : “काय झाडी,काय डोंगार,काय हाटेल,सगळं ओके मंधी हाय” 

या डायलॉगमुळे जगभरात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचलेले सांगोल्याचे विकासरत्न व सांगोला विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय 

पाणीदार आमदार शहाजीबापू पाटील यांचा वाढदिवस सांगोल्यातील शिवसेनेसह तमाम बापू प्रेमींकडून ढोल,ताशे व हलगीच्या तालात आणि फटाक्याची आतिषबाजी करुन तसेच 

सांगोला शहर व तालुक्यात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून आणि शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करुन मोठ्या जोशपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. 

 सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांचा वाढदिवस काल शनिवारी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. शनिवारी दिवसभर सांगोला येथील त्यांचे संपर्क कार्यालयासमोर सोलापूर जिल्ह्यासह 

सांगोला शहर व तालुक्यातील विवीध पक्षाचे नेतेमंडळी,पदाधिकारी तसेच भाळवणी (पंढरपूर) गटातील शिवसेनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते, सर्व पक्षीय नेतेमंडळी,मित्रपरिवार आणि

 तमाम बापू प्रेमींनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी ज्येष्ठ नेत्यांसह पदाधिकारी,कार्यकर्ते व आप्तेष्टांच्या शुभेच्छामुळे आमदार शहाजीबापू पाटील भारावून गेले होते.

 याप्रसंगी,स्वत: आम.शहाजीबापू यांनीही आपल्या संपर्क कार्यालयात स्व.बाळासाहेब ठाकरे व स्व.धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.

आम.शहाजीबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त चिकमहुद येथील त्यांच्या निवासस्थानी शनिवारी सकाळी त्यांच्या सुविद्य पत्नी रेखाताई पाटील,माजी सरपंच सुशिला कदम,

स्नुषा अपेक्षा पाटील,शोभा कदम,राधिका मगर,प्रिती पाटील,आक्काताई भोसले तसेच गावातील असंख्य महिलांनी आम.शहाजीबापू यांचे औक्षण केले.

यावेळी गांवातील लोकांनी त्यांच्या घरासमोर ढोल,ताशे,हलग्या वाजवत,फटाके वाजवून  

आमदार शहाजीबापू व त्यांच्या पत्नि रेखाताई पाटील यांना त्यांचे चिरंजीव दिग्विजय पाटील,नातू शंभूराजे पाटील,पंढरीनाथ भोसले आदींनी केक भरविला.

       सांगोला शहरातील महात्मा फुले चौकात आमदार शहाजीबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ७० टक्के सवलतीच्या दरात एल.ई.डी.टीव्ही,वाॅटर 

फिल्टर साहित्य विक्री स्टाॅलचे उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच महूद येथील ग्रामदैवत श्री अंबिका देवीचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.

 मंदिरात आ.पाटील यांच्या हस्ते वाॅटर फिल्टरचे उदघाटन करण्यात आले. यावेळी महूद गांव व वाड्या वस्त्यांवरील शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

यावेळी संजय मेटकरी,अंगद जाधव,महेंन्द्र बाजारे,संतोष पवार,के.टी.पवार, यशवंतराव खंबाले,कैलास खबाले,डॉ.शरद नागणे, ओंकार लवटे,

काका नागणे,विठ्ठल बागल,अरुण नागणे,उमेश पाटील,सुखदेव चव्हाण,बाळासाहेब पवार,नैनेश कांबळे,भिमराव नागणे,दत्ता येळे,संजय चव्हाण,

सद्दाम मुजावर,रमेश रुपनर,धनंजय कांबळे आदी बापू प्रेमींनी फटाके वाजवून व केक कापून त्यांना शुभेच्छा दिल्या.तसेच शिवणे ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच दादासाहेब घाडगे,

उपसरपंच उदय घाडगे,भीमशक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय बनसोडे, विलास घाडगे,प्रतापराव पाटील आदी मान्यवरांनी फेटा बांधून व श्रीफळ देऊन त्यांचा केला. 

 शनिवारी दिवसभर सांगोल्यात त्यांच्या संपर्क कार्यालयात राष्ट्रवादीचे अँड.दीपक पवार,विधानसभा प्रमुख प्रा.संजय देशमुख,अँड.विश्वासराव गायकवाड, शिवसेना उपजिल्हाप्रमुख जगदीश पाटील,

जिल्हा संपर्क प्रमुख सागर पाटील,तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे,शहर प्रमुख समीर पाटील,युवासेना तालुकाप्रमुख गुंडा खटकाळे,माजी नगरसेवक सोमेश यावलकर, 

आरपीआय तालुकाध्यक्ष खंडू सातपुते,किर्तीपाल बनसोडे,पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष इंगोले, पांडुरंग मिसाळ,बिरापंच 

आलदर,बाबासाहेब पाटील, विलास व्हनमाने,उद्योजक किरण पांढरे,भागवत तंडे, सौदागर केदार,योगेश खटकाळे,श्रीनिवास करे,सोमा ठोकळे,

माजी सरपंच अभिजीत नलवडे,अनिल मोटे, विष्णुपंत केदार,बाळासाहेब आसबे,महादेव पाटील, अजिंक्य शिंदे,शाहू मेटकरी,माजी उपसभापती संतोष देवकते,

बाळासाहेब झपके,बाळासाहेब बनसोडे, उल्हास धायगुडे,अमोल खरात,धनंजय काळे,सचिन काळे,डॉ‌.दादा जगताप,राजेंद्र मेटकरी,लक्ष्मण भोसले, नवनाथ येडगे तसेच शहरातील मुस्लिम समाजाचे 

हाजी शब्बीरभाई खतीब,दिलावरभाई तांबोळी,हाजी युसूफभाई मुल्ला,उस्मान इनामदार,इसाक तांबोळी, उद्योगपती रऊफ तांबोळी,मकबूल मुल्ला,निसार मुलाणी,अय्याज मणेरी,

खलील मणेरी,महिबुब मणेरी यांच्यासह परीट समाज,नाभिक समाज,गोंधळी समाज,होलार समाज व रामोशी समाजाचे बांधव तसेच विविध 

सामाजिक व राजकीय संघटनेचे पदाधिकारी आणि पत्रकार संघटनेच्या वतीने आ.शहाजीबापू पाटील यांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन व फेटा बांधून सत्कार करण्यात आला.

वाढदिवसानिमीत्त मान्यवरांनी आम.शहाजीबापूंना दिल्या शुभेच्छा :

आमदार शहाजीबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त शुक्रवारी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार शहाजीबापू यांचा पुष्पगुच्छ देऊन,सत्कार करुन पुढील राजकीय वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

तर,काल शनिवारी सकाळी खासदार श्रीकांत शिंदे,राज्याचे मंत्री शंभूराज देसाई,मंत्री दादा भुसे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील,माजी नगराध्यक्ष रफिकभाई नदाफ, माजी नगराध्यक्ष 

मारुतीआबा बनकर,भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत,उद्योगपती बाळासाहेब एरंडे,ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड, तानाजीकाका पाटील,

शिवसेनाप्रणित शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष धनंजय पवार,छोटा पुढारी घनश्याम दराडे, मनसेचे दिलीप धोत्रे आदी मान्यवरांनी आमदार शहाजीबापू यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या. 

तसेच सांगोला येथील जेष्ठ विधीज्ञ उदयबापू घोंगडे यांच्या निवासस्थानी आमदार शहाजीबापू पाटील यांचे माजी नगरसेविका शोभाकाकी घोंगडे,ज्योती 

घोंगडे,प्राजक्ता घोंगडे यांनी औक्षण करून व केक कापून शुभेच्छा दिल्या.यावेळी आनंद घोंगडे,अजिंक्य घोंगडे,दर्शन घोंगडे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments