मूकबधिर निवासी शाळा सांगोला येथे आमदार ॲड.शहाजी (बापू) पाटील
यांच्या वाढदिवसानिमित्त खाऊ वाटप.
कोळे प्रतिनिधी:- सांगोला तालुक्याचे दमदार पाणीदार आमदार व आपल्या गावरान भाषेतील बोली काय झाडी काय डोंगर फेम मा.श्री शहाजी (बापू) पाटिल यांच्या 67व्या वाढदिवसानिमित्त
शहाजी (बापू)पाटील त्यांचे कट्टर कार्यकर्ते फैयाज भाई शेख यांच्या हस्ते मुलांना समोसे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेतील सर्व मुलांना खाऊ वाटप करून मुलांशी फैयाज भाई शेख यांनी गप्पा व सुसंवाद साधला सर्व मुलांना भेटून आनंद व समाधान झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
शाळेतील सर्व कर्मचारी यांनी फैयाज भाई शेख यांचे आभार मानले.शाळेतील मुख्याध्यापिका,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 Comments