स्व. डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयातील
स्व.गणपतराव देशमुख यांचा पुतळा बदलण्याची मागणी
सांगोला / प्रतिनिधी : (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
स्व डॉ गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला येथे नुकताच स्व डॉ गणपतराव देशमुख यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला आहे. या पुतळ्यामधील स्व डॉ गणपतराव देशमुख यांचा चेहरा त्यांच्या व्यक्तिमत्वाशी साधर्म्य दर्शविणारा नाही, स्व आबासाहेब त्यांच्या वयाच्या कोणत्याच टप्प्यात असे दिसत नव्हते
त्यामुळे हा पुतळा तात्काळ बदलावा अशी लेखी मागणी सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त यशवंत शिंदे आणि सदाशिव म्हमाणे यांनी संस्थेकडे केली आहे. गणपतराव देशमुख
सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाने नुकताच लाखो रुपये खर्च करून संस्थेच्या आवारात स्व गणपतराव देशमुख यांचा पूर्णाकृती पुतळा उभा केला आहे. तसेच संस्थेअंतर्गत असलेल्या विज्ञान महाविद्यालयपुतळ्याच्या पाटीवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे नावच बदलले...!!
संस्थेच्या आवारात स्व डॉ गणपतराव देशमुख यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळा अनावरण प्रसंगी उपस्थित मान्यवरांची पुतळ्याखाली पाटी बसविण्यात आली आहे.
यावर चक्क उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आडनाव बदलून फडणवीस ऐवजी फडवनीस असे लिहण्यात आले आहे. संस्थेत असलेल्या प्राध्यापक, शिक्षक तसेच विद्यार्थ्यांनी ही चूक सचिवांच्या निदर्शनास आणून दिली होती.
तरीही, यामध्ये दुरुस्ती करण्यात आली नाही. ही गंभीर चूक तात्काळ दुरुस्ती करून पुतळा आणि पुतळ्या खाली असलेली पाटी बदलावी अशी मागणी विश्वस्त यशवंत शिंदे आणि सदाशिव म्हमाणे यांच्याकडून करण्यात आली आहे.
सांगोला या महाविद्यालयाचे नाव बदलून स्व डॉ गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला असे करण्यात आले होते. याप्रसंगी माजी केंद्रीय कृषीमंत्री खा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीस्व.डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालयातील....
उपस्थिती लावली होती.
यापूर्वी सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला या संस्थेस संस्थापक स्व नारायणराव भगरे शिक्षण प्रसारक मंडळ असे नाव द्यावे तर संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयास
स्व भाई जगन्नाथराव लिगाडे कनिष्ठ महाविद्यालय असे नाव द्यावे आणि संस्थेअंतर्गत असलेल्या माध्यमिक विद्यालयाला स्व माणिकराव बाबर माध्यमिक विद्यालय असे नामकरण करावे अशी लेखी मागणी केली होती.
याबाबत अकोला आणि डोंगरगाव ग्रामपंचायतींनी याबाबतचे ठराव आणि मागणीचे पत्र संस्थेला दिले होते. याची तात्काळ कार्यवाही करण्याचा शब्दही संस्थेचे सचिव विठ्ठलराव शिंदे यांनी दिला होता. मात्र या घटनेला तब्बल ६ महिन्यांचा कालावधी लोटला तरी संस्थेने यावर कोणताही निर्णय घेतला नाही.
स्व गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याची दुरुस्ती तसेच नामकरण बाबत २० जानेवारी २०२४ पूर्वी संस्थेने निर्णय घ्यावा अन्यथा वयाच्या ८५ व्या वर्षी आम्हाला २६ जानेवारी पासून उपोषणाला बसावे लागेल असा इशाराही विश्वस्त यशवंत शिंदे आणि सदाशिव म्हमाणे यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.


0 Comments