google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला शहरात नवरात्रौत्सवानिमित्त चेतनसिंह केदार-सावंत मित्र परिवाराच्या वतीने दांडिया गरबा स्पर्धेचे आयोजन

Breaking News

सांगोला शहरात नवरात्रौत्सवानिमित्त चेतनसिंह केदार-सावंत मित्र परिवाराच्या वतीने दांडिया गरबा स्पर्धेचे आयोजन

 सांगोला शहरात नवरात्रौत्सवानिमित्त चेतनसिंह केदार-सावंत मित्र


परिवाराच्या वतीने दांडिया गरबा स्पर्धेचे आयोजन

नवरात्रौत्सवानिमित्त चेतनसिंह केदार-सावंत मित्र परिवाराच्या वतीने दांडिया गरबा स्पर्धेचे आयोजनसांगोला (तालुका प्रतिनिधी): छ. शिवाजीनगर नवरात्रोत्सव मंडळ, छ. शिवाजीनगर सांगोला संचलित दांडिया गरबा नाईट स्पर्धेचे आयोजन भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार - सावंत मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

 या स्पर्धेसाठी रोख रकमेची बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या महिलांसाठी लकी ड्रॉ काढण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे. 

सदरच्या स्पर्धा २२, २३ आणि २४ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ६ ते १० या वेळेत सांगोला शहरातील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर आयोजित करण्यात आल्या आहेत.भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार - सावंत मित्र परिवाराच्या वतीने छ. शिवाजीनगर नवरात्रोत्सव

 मंडळ, छ. शिवाजीनगर सांगोला संचलित दांडिया गरबा नाईट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दांडिया गरबा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदरच्या स्पर्धा २२, २३ आणि २४ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ६ ते १० या वेळेत सांगोला शहरातील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर आयोजित करण्यात आल्या आहेत.

 या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट दांडिया जोडी ७००१ रुपये बक्षीस, सर्वोत्कृष्ट गरबा जोडी ७००१ रुपये बक्षीस, सर्वोत्कृष्ट दांडिया ग्रुप ७००१ रुपये बक्षीस, सर्वोत्कृष्ट दांडिया ग्रुप ७००१ रुपये बक्षीस अशी बक्षिसे देण्यातयेणार आहेत. सदर कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या महिलांसाठी लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. 

२२ ऑक्टोंबर रोजी आटा चक्की, मायक्रो ओव्हन, मिक्सर, २३ ऑक्टोंबर रोजी तीन अँड्रॉइड मोबाईल, २४ ऑक्टोंबर रोजी ३ पैठणी साडी अशी लकी ड्रॉ बक्षिसे देण्यात येणार आहेत.

 महिलांनी नावनोंदणीसाठी सुजाता केदार सावंत ८८८८८८१०१०, स्वाती मगर ९४०४६६६५०२, शोभा देशमुख ९९६०१५६६९६, योगिता शिंदे ९४०४२८०००३, राणी पवार ९६०४६११९५८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

या स्पर्धेसाठी ज्योतिर्लिंग फ्रूटकंपनी अँड ट्रान्सपोर्टचे बंडू केदार, श्रीनाथ स्टोन क्रशर अँड ज्योतीस्मती क्रिएशन्सचे संजय केदार, अनिल खटकाळे (चेअरमन), अनघादत्त इंजिनिअरिंग अँड डेव्हलपर्सचे इंजी. बाळराजे देशमुख, नाथबाबा मंगल भांडार अँड केटरर्स, नाथबाबा डेकोरेटर्सचे शिंदे 

बंधू, अफझल शेख पुणे, सचिन ज्वेलर्सचे रामचंद्र मिसाळ यांचे आर्थिक सहकार्य लाभले आहे. अधिक माहितीसाठी किरण चव्हाण ९७६३२७९६९६, इन्नुस नदाफ ९५६११५८६८६, सौरभ देशपांडे ९०९६९६०५०७, शाम माळी ९८५०५२३९९३, चिवळ्या कोळी ९०९६९६९१९१ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments