google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक घटना...फ्लॅट दाखवण्याच्या बहाण्याने बोलवून जावयाची हत्या, मग मुलीलाही संपवलं

Breaking News

खळबळजनक घटना...फ्लॅट दाखवण्याच्या बहाण्याने बोलवून जावयाची हत्या, मग मुलीलाही संपवलं

खळबळजनक घटना...फ्लॅट दाखवण्याच्या


बहाण्याने बोलवून जावयाची हत्या, मग मुलीलाही संपवलं

मुंबईतून ऑनर किलिंगचं मोठं आणि धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. यात एका मुस्लीम कुटुंबाने स्वतःच्या

 मुलीची आणि हिंदू जावयाची हत्या केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे. 

आरोपी गोरा खानने त्याचा मुलगा आणि साथीदारांसोबत मिळून आपली मुलगी गुलनाज खान आणि तिचा हिंदू पती करण चंद्र यांची हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.

नागराज मंजुळे यांच्या सैराट सिनेमाची आठवण करून देणारी ही धक्कादायक घटना मुंबईमध्ये घडली आहे. करण आणि गुलनाज यांनी उत्तर प्रदेशमध्ये लग्न केलं होतं आणि नंतर ते मुंबईत आले होते. 

आरोपी गोरा खान याने आपल्या जावयाला मुंबईतील आपलं नवीन घर दाखविण्याच्या बहाण्याने गोवंडी परिसरात बोलावलं. यानंतर जावयाला निर्जनस्थळी नेलं आणि त्याची हत्या करून मृतदेह विहिरीत फेकून दिला.

आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तर जावयाच्या हत्येनंतर त्याने स्वतःच्या मुलीलाही संपवलं. करणच्या हत्येनंतर आरोपींनी गुलनाजची हत्या केली

 आणि तिचा मृतदेह नवी मुंबईत फेकून दिला. या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे. यात पीडित गुलनाजचे वडील, भाऊ आणि त्याचा मित्र आहेत.

Post a Comment

0 Comments