google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला महिला शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घरगुती गौरी सजावट स्पर्धेचे आज बक्षीस वितरण ‌स्पर्धेतील सहभागी महिलांना मिळणार आकर्षक साडी भेट

Breaking News

सांगोला महिला शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घरगुती गौरी सजावट स्पर्धेचे आज बक्षीस वितरण ‌स्पर्धेतील सहभागी महिलांना मिळणार आकर्षक साडी भेट


 
सांगोला महिला शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घरगुती गौरी सजावट स्पर्धेचे आज

बक्षीस वितरण ‌स्पर्धेतील सहभागी महिलांना मिळणार आकर्षक साडी भेट

सांगोला : प्रतिनिधी( शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

 सांगोला महिला शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने व विधानसभा महिला सांगोला मतदार संघाचे अध्यक्ष सौ.सुचिताकाकी मस्के यांच्यावतीने आयोजीत

 करण्यात आलेल्या घरगुती गौरी सजावट स्पर्धेचे आज गुरूवार दिनांक 19 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संयोजकानी दिली. 

सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ कु.कृष्णाई दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्या शुभहस्ते आणि कु.सुष्टी खरात यांच्या अध्यक्षतेखाली व इतर मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्यासाठी 11601 व ह.भ.प.स्व.शारदादेवी साळुंखे-पाटील यांच्या स्मरणार्थ स्मृतीचषक, 

व्दितीय क्रमांक विजेत्यासाठी 8601 रू व ह.भ.प.स्व.शारदादेवी साळुंखे-पाटील यांच्या स्मरणार्थ स्मृतीचषक, तृतीय क्रमांकासाठी 6601 रू. व उत्तेजनार्थ क्रमांकासाठी 3601 व ह.भ.प.स्व.शारदादेवी साळुंखे-पाटील 

यांच्या स्मरणार्थ स्मृतीचषक बक्षिसे ठेवण्यत आली आहेत. स्पर्धेतील सर्व स्पर्धकांना आकर्षक साडी भेट वस्तू देण्यात येणार आहे. 

सदरची सर्व बक्षिसे कै.रामचंद्र आबा मस्के आणि कै.सीताबाई रामचंद्र मस्के यांच्या स्मरणार्थ श्री.दिलीपकाका मस्के यांच्यावतीने देण्यात येणार आहेत.

तरी स्पर्धेतील सहभागी महिलांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहनही सौ.सुचीताकाकी मस्के यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments