खळबळजनक घटना..एकाच घरातील पाच जणांच्या मृत्यूचं गूढ उकललं!
सुनेनंच कुटूंबात विष कालवलं, वाचा थरारक घटनाक्रम
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील महागाव येथे एकाच कुटुंबातील ५ जणांच्या अचानक मृत्यूचे गूढ निर्माण झाले होते. राज्यभरात या मृत्यूची चर्चा सुरू आहे. गडचिरोलीतील शंकर पिरु कुंभारे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील चार व्यक्तींचा
अवघ्या २० दिवसाच्या कालावधीत अचानक आजारी पडून मृत्यू झाला होता.या घटनेमुळे परिसरात भीती आणि संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर या मृत्यूसत्राचे गूढ उकलण्यात गडचिरोली पोलिसांना यश आलं आहे.
शंकर कुंभारे आणि त्यांची पत्नी विजया यांची २० सप्टेंबर रोजी अचानक प्रकृती बिघडली. त्यांना अहेरी, चंद्रपूर त्यानंतर नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र २६ सप्टेंबरला शंकर कुंभारे तर २७ सप्टेंबरला त्यांच्या पत्नी विजया यांचा मृत्यू झाला.
आई-वडिलांच्या अंत्यविधीसाठी आलेल्या मुलगी कोमल आणि मुलगा रोशन तसेत मुलांची मावशी वर्षा उराडे यांचीही प्रकृती बिघडली. उपचारानंतर त्यांचीही प्रकृती सुधारत नव्हती. अखेर या तिघांचाही मृत्यू झाला.
८ ऑक्टोबर रोजी कोमल दहागावकर, १४ ऑक्टोबरला आनंदा ऊर्फ वर्षा उराडे तर १५ ऑक्टोबरला रोशन कुंभारे याचाही मृत्यू झाला.
शंकर कुंभारे यांचा दिल्ली येथे कामानिमित् असणारा मोठा मुलगा सागर कुंभारे हा चंद्रपूर येथे आला होता. मात्र, आई वडिलांच्या मृत्युनंतर तो दिल्लीला परत गेला. त्यानंतर अचानक त्याचीही प्रकृती बिघडली. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
गोपनीय सुत्रांकडून गावात शंकर कुंभारे यांची सून संघमित्रा कुंभारे आणि मेहुण्याची पत्नी रोझा रामटेके यांनी हे हत्याकांड केल्याची माहिती होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या हालचालींवर बारकाईन नजर ठेवली.
का केली पाच जणांची हत्या?
आरोपी सून संघमित्रा कुंभारे हिने रोशन कुंभारे याच्यासोबत तिच्या आई-वडिलांच्या विरोधात जाऊन लग्न केले. या कारणामुळे तिच्या वडिलांनी आत्महत्या केली. यानंतर पती रोशन आणि सासरचे मंडळी तिच्या माहेरच्या लोकांना वारंवार टोमणे मारायचे.
तसेच सहआरोपी रोझा रामटेके हिने तिच्या सासऱ्यांच्या नावे असलेल्या शेतजमिनीत शंकर कुंभारे यांची पत्नी विजया कुंभारे आणि तिच्या इतर बहिणी हिस्सा मागून नेहमी वाद करीत होत्या. यामुळे त्या दोघींनी संपूर्ण कुंभारे कुटुंब आणि त्यांच्या नातलगांना विष देऊन जीवे ठार मारण्याची योजना आखली.
रोझा रामटेके हिने तेलंगणा राज्यात जाऊन विष आणले. संघमित्राने जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा-तेव्हा त्या दोघींनी मृतकांच्या व आजारी व्यक्तींच्या खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये मिसळून त्यांना खाण्यास दिले.


0 Comments