मोठी बातमी...‘सबसे कातील गौतमी पाटील’ला सोलापुरात कार्यक्रमासाठी नो एन्ट्री
गौतमीच्या कार्यक्रमाची आणि तिच्या नृत्याची चांगलीच क्रेझ सोशल मीडियामुळे तरुणांमध्ये आहे. तिच्या लावणी कार्यक्रमांमध्ये नेहमीच गोंधळ होतो. पोलिसांना लाठीमार करावा लागतो. या पार्श्वभूमीवर सोलापुरात तिच्या लावणी कार्यक्रमासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.
सोलापुरातील एका स्थानिक डिजिटल वृत्तवाहिनीने ‘ डिस्को दांडिया ‘आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गौतमी पाटील येणार होती. यात ती नृत्य करणार होती.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पोलीस प्रशासनाकडे परवानगी मागितली होती. परंतु कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण सांगत विजापूर नाका पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे.
या काळात नवरात्रौत्सवामुळे पोलिसांकडील मनुष्यबळ बंदोबस्तसाठी वापरले जात असल्याने, गौतमीच्या कार्यक्रमात पोलीस बंदोबस्त देणे शक्य नसल्याने पोलिसांकडून परवानगी देण्यात आली नाही. तसे पत्र पोलिसांनी आयोजकाना पत्र दिले आहे.


0 Comments