google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज! राज्यातील पोलीस दलात कंत्राटी पोलिसांची भरती, तीन हजार पदं भरली जाणार; गृह खात्याचा निर्णय

Breaking News

ब्रेकिंग न्यूज! राज्यातील पोलीस दलात कंत्राटी पोलिसांची भरती, तीन हजार पदं भरली जाणार; गृह खात्याचा निर्णय

 ब्रेकिंग न्यूज! राज्यातील पोलीस दलात कंत्राटी पोलिसांची भरती, तीन हजार पदं भरली जाणार; गृह खात्याचा निर्णय 


मुंबई पोलीस दलात तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह खात्यानं घेतला आहे. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीनं जास्तीत जास्त 11 महिन्यांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.

मुंबई पोलिसांकडे मनुष्यबळाची तीव्र टंचाई असून, नवीन भरती होईपर्यंत पोलीस आयुक्तांच्या विनंतीवरून गृह विभागानं हा निर्णय घेतला आहे. या कंत्राटी पोलिसांच्या पगारासाठी 30 कोटी रुपये खर्चासही सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे.

मुंबई पोलीस दलात कंत्राटी भरती केली जाणार आहे. मनुष्यबळाची टंचाई असल्यानं तब्बल 3 हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह खात्याच्या वतीनं घेण्यात आला आहे. त्यासाठी गृहखात्याकडून 30 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

मुंबई पोलीस दलात कंत्राटी पद्धतीनं भरण्यात आलेल्या पदांवर घेण्यात आलेल्या पोलिसांच्या पगारासाठी 30 कोटींच्या खर्चाला सरकारकडून मंजुरीही देण्यात आली आहे.

मुंबई पोलीस दलात सध्या मनुष्यबळाची टंचाई असून नवी भरती प्रक्रिया होईपर्यंत कंत्राटी भरती करण्यासंदर्भात पोलीस आयुक्तांनी विनंती केली होती. मुंबई पोलीस आयुक्तांच्या विनंतीनंतर गृह विभागानं कंत्राटी भरती करण्यासंदर्भातील निर्णय घेतला आहे.

राज्य सुरक्षा महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीने जास्तीत जास्त 11 महिन्यांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. कंत्राटी पद्धतीनं भरती झालेल्या पोलिसांच्या पगारासाठी तब्बल 30 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

गणेशोत्सव झाला असला तरीदेखील नवरात्रोत्सव, रमजान, दिवाळी अशा सणासुदीच्या काळात मुंबईत बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलिसांची गरज भासते. याच पार्श्वभूमीवर राज्य सुरक्षा महामंडळांच्या जवानांतून मुंबई पोलीस दलात कंत्राटी भरती केली जाणार आहे.

11 महिने किंवा भरती होण्यापर्यंतचा कालावधी यातील जो कमी कलावधी असेल तेवढ्या काळापुरती ही भरती राहणार आहे. मुंबई पोलीस दलातील कंत्राट संपलं की, सुरक्षा महामंडळाचे जवान पुन्हा आपल्या पूर्वीच्या सेवेत रूजू होतील.

 यासाठी 100 कोटी 21 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, पोलिसांच्या पगारासाठी 30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे

Post a Comment

0 Comments