सांगोला तालुक्यातीलअचकदानी गावातली उपोषणकर्ते विजय पाटील यांच्याकडे प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष.
त्यांना काही बरेवाईट झाल्यास होणाऱ्या परिणामास सांगोला तालुक्यातील शासकीय अधिकारी जबाबदार असतील- रणसिंह देशमुख
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला तालुक्यातील अचकदानी गावामध्ये आमरण उपोषणास बसलेले श्री विजय तातोबा पाटील यांचे प्रकृती खालावली त्यांना सोलापूर येथील सिविल हॉस्पिटल ला हलवण्यात आले आहे.
तसेच उपोषणास बसलेले विजय पाटील यांच्याकडे शासकीय अधिकारी यांनी पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. तसेच महाराष्ट्रातील आंदोलन दाबण्याचा प्रयत्न या सरकारचा दिसून येत आहे.
त्याबाबत शासकीय अधिकारी सरकारला मदत करतात का हा मोठा प्रश्न मराठा व धनगर समाजाला पडला आहे. मराठा समाज धनगर समाज ही शांततेत आंदोलन करत आहेत. तसं उपोषणास बसलेले माननीय श्री मनोज जरांगे पाटील व विजय पाटील असतील तसेच अनेक महाराष्ट्रातील तरुणही उपोषणास बसले आहेत
याकडे शासकीय अधिकारी यांनी पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. तसेच यां आमरण उपोषण कर्त्याना काही बरं वाईट झाल्यास शासकीय अधिकारी व हे सरकार जबाबदार असेल एवढं लक्षात ठेवावं. मराठा व धनगर समाजाची ही शांततेत आंदोलन चालू आहेत यावर तातडीने सरकारने निर्णय घ्यावा.
आंदोलकांना काही बरे वाईट झाल्यास महाराष्ट्र मध्ये याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. आता गाव बंदी आहे पुन्हा या पुढार्यांना राज्य बंदी घातल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असे रणसिंह देशमुख म्हटले आहेत.
0 Comments