google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आयुष भारत डॉक्टर असोसिएशनचा मराठा आरक्षण आंदोलनास पाठिंबा

Breaking News

आयुष भारत डॉक्टर असोसिएशनचा मराठा आरक्षण आंदोलनास पाठिंबा

 आयुष भारत डॉक्टर असोसिएशनचा


मराठा आरक्षण आंदोलनास पाठिंबा

मुंबई प्रतिनिधी : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करत महाराष्ट्र राज्यातील आयुष भारत डॉक्टर असोसिएशनच्या सर्व डॉक्टर व सर्व पदाधिकारी आरोग्य सेवा स्थगित करण्यात येत असल्याची माहिती 

आयुष भारत डॉक्टर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अमीर मुलाणी व राष्ट्रीय अध्यक्ष अल्टरनेटिव्ह मेडिसिन डॉ.एस एन सुतार यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली. केंद्र सरकारने यासंदर्भात एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणीही त्यांनी केली.

मराठा आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घेण्यासाठी सरकारने वेळ मागून घेतला होता. ज्यावेळी सरकार एखादी तारीख देते त्यावेळी निश्चित निर्णय होणार असे गृहीत धरले जाते; परंतु तसे काहीच झाले नाही. आर्थिक निकषावरील आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने घेतला 

त्याप्रमाणे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे जाऊन निर्णय घेणे आवश्यक होते; परंतु त्याबाबत सरकारमधील एकही मंत्री काहीच वाच्यता करत नसल्याने यावरून मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. 

आयुष भारत डॉक्टर असोसिएशन यासंदर्भात राज्य सरकारने तातडीने पावले उचलून केंद्र सरकारला हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे डॉ.एस एन सुतार यांनी सांगितले.

मला बोलता येते तोपर्यंत चर्चेला या, असा जरांगे-पाटील यांनी सरकारला इशारा दिला होता. तरीही सरकार काही बोलत नाही. यावरून राज्य सरकार मराठा समाजाची फसवणूक करत 

असल्याचे जनतेच्या लक्षात आले आहे. आरक्षणासाठी आम्ही हवी तेवढी ताकद लावू, पण तरुणांनी आत्महत्या करू नयेत, असे आवाहन डॉ.अमीर मुलाणी व डॉ.एस एन सुतार यांनी केले आहे. 

केंद्र राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छा दिसत नाही, असा आरोप आयुष भारत डॉक्टर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अमीर मुलाणी राष्ट्रीय अध्यक्ष आयुष भारत अल्टरनेटिव्ह मेडिसिन डॉ एस एन सुतार यांनी केले आहे.

जर मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर महाराष्ट्रातील आयुष भारत डॉक्टर असोसिएशन चे सर्व डॉक्टर संप पुकारणार आहे जर आम्ही सर्व डॉक्टर रस्त्यावरती उतरल्यानंतर आरोग्य सेवा विस्कळीत होऊ शकते जर आरोग्य सेवा विस्कळीत झाले

 तर याला जबाबदार राज्य शासन व केंद्र शासन असेल जर प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर या आठवड्यामध्ये आम्ही सर्व डॉक्टर संप पुकारणार आहे

 याची राज्य सरकार व केंद्र शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी अन्यथा आम्ही काळे झेंडे घेऊन रस्त्यावरती उतरू पण आमच्यावर होत असणारा अन्याय मुळीच सहन करणार नाही व आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी लढतच राहो असे 

वक्तव्य आयुष भारत डॉक्टर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अमीर मुलाणी राष्ट्रीय अध्यक्ष आयुष भारत अल्टरनेटिव्ह मेडिसिन डॉ.एस एन सुतार यांनी केले. यावेळी आयुष भारत डॉक्टर असोसिएशनचे सर्व सदस्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments