सातारा जिल्हाधिकारी कार्यलयावर महाराष्ट्र विकास सेना पक्षाची धडक
निवासी उपजिल्हाधिकारी यांना दिले विविध मागण्यांचे निवेदन
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
प्रतिनिधी : सातारा : सातारा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांनी निवेदन पाठवले आहे.
निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी स्वीकारले.महाराष्ट्र राज्यातील आणि सातारा जिल्ह्यातील विविध प्रश्नासाठी महाराष्ट्र विकास सेना पक्षाची सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आहे.
महाराष्ट्र विकास सेना पक्ष महाराष्ट्र राज्यातील शेतकरी, बांधकाम कामगार,शाळेचे खाजगीकरण आशा ज्वलंत प्रश्नासाठी आवाज उठवीत असून सातारा जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रश्न शासन स्तरावर मांडण्यासाठी सरसावला असल्याचे दिसून येत आहे.
निवेदनात सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या परिस्थितीचा आढावा घेवून दुष्काळ जाहीर करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा.कर्जमाफी योजनेमध्ये दोन लाखांच्या वर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देण्यात यावी.शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या खतांचे दर कमी करण्यात यावेत.
दुधाचे दरामध्ये वाढ करण्यात यावी मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात यावा.सरकारी शाळेचे खाजगीकरण तात्काळ रद्द करण्यात यावे.सातारा जिल्ह्यातील परप्रांतीयांच्या नोंदी तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये करण्यात याव्यात .
दुष्काळ ग्रस्त भागात तात्काळ जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात महाराष्ट्र कामगार कल्याण महामंडळाकडे नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना मिळणारे जेवण बंद करण्याचा घेतलेला निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा.
अशा मागण्या करण्यात आल्या आहेत,यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा पक्षप्रमुख किरण साठे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सातारा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पाठविलेल्या निवेदनात दिला आहे.
0 Comments