google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक पंढरपूर तालुक्यात घटना ! भर चौकात मराठा तरुणाची आत्महत्या; मृतदेह खाली उतरविण्यास मराठा समाजाचा विरोध;

Breaking News

धक्कादायक पंढरपूर तालुक्यात घटना ! भर चौकात मराठा तरुणाची आत्महत्या; मृतदेह खाली उतरविण्यास मराठा समाजाचा विरोध;

 धक्कादायक पंढरपूर तालुक्यात घटना ! भर चौकात मराठा तरुणाची आत्महत्या;


मृतदेह खाली उतरविण्यास मराठा समाजाचा विरोध; 

पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथे भर चौकात युवकांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

दरम्यान, भगव्या गमजाने गळफास घेतल्याने मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची चर्चा घटनास्थळावर सुरु आहे.

घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत, मात्र मृतदेह खाली उतरवण्यास सकल मराठा समाजाच्या वतीने विरोध होत आहे. घटनास्थळी मोठ्या संख्येने सकल मराठा समाज उपस्थित झाला आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सोलापूर शहर जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. राज्यातील अनेक युवकांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आपला जीव गमाविला.

कालपासून आंदोलनाला राज्यात ठिकठिकाणी हिंसक वळण लागले आहे. आत्महत्या करू नका, हिंसक वळण थांबवा, आंदोलनं शांतता मार्गाने करा असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments