ब्रेकिंग न्यूज..राज्यात ठिकठिकाणी 80 पेक्षा जास्त एसटी फोडल्या ; 36 आगाराची वाहतूक बंद
मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिंदे सरकारने ३० दिवसांचा वेळ मागितला होता. मात्र, ४० दिवस उलटून गेलेत, तरी देखील शिंदे सरकारने कुठलेही ठोस पाऊल उचलले नाही.
त्यामुळे मराठा समाज आणखी आक्रमक झाला आहे. राज्यात ठिकठिकाणी आंदोलने केली जात असून काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडत आहेत. या आंदोलनाचा जबरदस्त फटका एसटी महामंडळाला बसला आहे.
राज्यात ठिकठिकाणी 80 पेक्षा जास्त एसटी बसची तोडफोड तसेच जाळपोळीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे महामंडळाकडून अनेक ठिकाणी बस सेवा बंद करण्यात आली आहे.
तर काही ठिकाणच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. अचानक बससेवा ठप्प झाल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. दरम्यान सोलापूर डेपोतून धावणाऱ्या बसच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहेत. पुणे एसटी आगाराला मराठा आंदोलनाचा फटका बसला आहे. पुण्यातून छत्रपती संभाजीनगर, नाशिक, सोलापूर येथे धावणाऱ्या बसच्या काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
0 Comments