भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा सप्ताह अंतर्गत
व्यक्तिमत्व, व्हिजन, धोरण आणि यश या विषयावर भव्य प्रदर्शनी लावण्याचे आयोजन भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाचा वेगाने विकास - चेतनसिंह केदार - सावंत
सांगोला (प्रतिनिधी): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य दिल्यामुळेच देशाचा विकास होऊ शकला. संरक्षण सज्जतेसह उद्योग, कृषी, शिक्षण, महिला सक्षमीकरण पायाभूत सुविधांचा विकास, वैद्यकीय सुविधा,
रेल्वेचे आधुनिकीकरण, राष्ट्रीय महामार्गाचे विणलेले जाळे आदींसह विविध क्षेत्रात देशाने प्रगती केली आहे असे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी व्यक्त केले.
भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा सप्ताह अंतर्गत भारतीय जनता पार्टीच्या वतीने सांगोला शहरातील वाढेगांव नाका येथील
जोतिर्लीग कॉम्प्लेक्समध्ये जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार – सावंत यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्व, व्हिजन, धोरण आणि यश या विषयावर भव्य प्रदर्शनी लावण्याचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रदर्शनी कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते शिवाजीराव गायकवाड व वीर माता वीर पत्नी यांच्य हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार -सावंत, ज्येष्ठ नेते शिवाजीराव गायकवाड, माजी नगराध्यक्ष नवनाथ पवार, यशवंत भोसले,
अनिल कांबळे, वसंत सुपेकर, आनंद फाटे, दिलीप सावंत, दुर्योधन हिप्परकर, विजय बाबर, संजय गंभीरे, मानस कमलापुरकर, परेश खंडागळे, शिवाजी ठोकळे, विजय ननवरे, गणेश कदम, प्रवीण जानकर, विशाल कुलकर्णी,
मोहन बजबळे, संजय केदार, विश्वास कारंडे, बिरा मेटकरी, संजय गव्हाणे, दीपक केदार वीरमाता हिराबाई गायकवाड, तारुबई दुरुकुळे, माजी सैनिक नरेश बाबर,उत्तम चौगुले, रामहरी नलावडे,केशव लेंडवे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 Comments