आमदार शहाजीबापू पाटील यांच्यामुळेच ११तालुक्यासह सोलापूर शहराचा
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला - तानाजी काका पाटील
सांगोला प्रतिनिधी( शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सध्या पर्जन्यमान कमी असल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे यामुळे सांगोला तालुक्यातील शिरभावी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी व सांगोला शहरासाठी उजनी धरणातील पाणी उपलब्ध होत नव्हते
याकरिता आमदार शहाजी बापू पाटील यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून उजनी धरणाचे साडेचार टीएमसी पाणी सोडून घेतले यामुळे सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुके
सोलापूर शहर यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला सांगोला शहरातील व तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होणार असल्याने सांगोला तालुक्यातील व सांगोला शहरातील नागरिकांनी आमदार शहाजी बापू पाटील यांचा सत्कार केला
यावेळी बोलताना तानाजी काका पाटील म्हणाले की केवळ आमदार शहाजी बापू पाटील यांच्यामुळेच अकरा तालुक्यातील
व सोलापूर शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला लोकप्रतिनिधी गप्प असताना हा प्रश्न केवळ आमदार शहाजी बापू पाटील यांनी लावून धरला होता
आमदार शहाजी बापू पाटील व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील यांच्या मैत्रीपूर्ण संबंधामुळेच हे घडू शकले यावेळी सांगोला शहरातील माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ आनंद घोंगडे अन्य मान्यवर उपस्थित होते


0 Comments