धक्कादायक प्रकार...पोलीस भरती झालेल्या तरुणीला दिला EWS
चा बनावट दाखला, महा-ई-सेवा केंद्र चालकावर गुन्हा दाखल
पोलीस दलात भरती झालेल्या तरुणीस आर्थिक दुर्बल घटकाचा (EWS) चा बनावट दाखला दिल्याप्रकरणी महा ई सेवा केंद्र चालक संजय घोडके याच्यावर गुन्हा दाखल
पोलीस दलात भरती झालेल्या तरुणीस आर्थिक दुर्बल घटकाचा (EWS) चा बनावट दाखला दिल्याप्रकरणी बोराळे येथील महा ई सेवा केंद्र चालक संजय घोडके याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाची फिर्याद नायब तहसीलदार चंद्रकांत हेडगिरे यांनी दाखल केली. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली.
या घटनेची हकीगत अशी की,तनुजा तानाजी नकाते रा.बोराळे हिची पोलीस भरतीत निवड झाल्याने पोलीस आयुक्त कार्यालय, डी. एन. रोड बृहन्मुंबई यांचे पत्र जा.क्र. पोआ/कक्ष-9 (पोभ) /9(1)/3157/2023 नुसार 14 सप्टेंबर रोजी (EWS) पडताळणी करीता
प्रस्ताव आल्याने तनुजा तानाजी नकाते हिचेकडील (EWS) ची महा ऑनलाईन प्रोर्टलवर बारकोड क्रमांक 58462205145005678015 पडताळणी केली असता सदरचा दाखला हा गणेशकर आशुतोष बाळासाहेब यांचे नांवे दिल्याचे दिसून आले.
महा ई सेवा केंद्राचे चालक सुहास सुर्यकांत घोडके रा. बोराळे याने सदरचे बारकोड क्रमांक तसाच ठेवून गणेशकर आशुतोष बाळासाहेब यांच्या नावामध्ये तांत्रीक पध्दतीने अनाधिकृत फेरबदल करून त्याठिकाणी तनुजा तानाजी नकाते
रा. बोराळे हिचे नावे टाकून बनावट आर्थिक दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र दिल्याचे निष्पन्न झाल्याने काल दि. 20 रोजी नायब तहसीलदार चंद्रकांत हेडगिरे,मंडलाधिकारी धनंजय इंगोले,
तलाठी भारत गायकवाड, कोतवाल यलगुंडा पाटील असे यांनी तहसीलदाराच्या आदेशाने बोराळे येथील महा ई सेवा केंद्रास सील केले. तहसीलदाराचा आदेश जाक. क्र. /
अभिलेख कावि/1165/2023 दि. 21 सप्टेंबर नुसार चालक सुहास सुर्यकांत घोडके रा. बोराळे यांच्या विरुध्द भादवि कलम 420, 467, 468, 471 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
बनावट दाखल्यामुळे सदर तरुणीला पोलीस भरतीतून बाजूला व्हावे लागले यापूर्वी एका महा-ई-सेवा केंद्र चालकाने मागितला
एका जातीचा दाखला आणि दिला दुसऱ्या जातीचा दाखला ही घटना ताजी असतानाच पुन्हा हा बनावट दाखल्याचे प्रकरण उजेडात आले आहे
सध्या तालुक्यामधील महा-ई-सेवा केंद्र सरकारच्या मनमानी कारभाराबद्दल नागरिकांमध्ये नाराजी असताना याकडे महसूल खात्याचे अधिकारी दुर्लक्ष केल्याने असे प्रकार घडत असलेली चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली.


0 Comments