google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक प्रकार..दिघंचीत बंद घराचे कुलूप तोडून दीड लाखांचे दागिने लंपास

Breaking News

धक्कादायक प्रकार..दिघंचीत बंद घराचे कुलूप तोडून दीड लाखांचे दागिने लंपास

धक्कादायक प्रकार..दिघंचीत बंद घराचे कुलूप तोडून दीड लाखांचे दागिने लंपास


 आटपाडी (प्रतिनिधी )आटपाडी तालुक्यातील दिघंची येथे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल दीड लाख रुपयांचे दागिने लंपास केल्यास घटना घडली असून याप्रकरणी आटपाडी पोलिसात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, दिघंची येथील कटफळ गल्ली येथे प्रशांत अश्विनीकुमार मोरे (वय 37) हे राहण्यास आहेत. दिनांक १९ च्या पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कोयंडा व कूलूप तोडून आत प्रवेश केला.

 यामध्ये 32,000 रु.कि.चे सोन्याची चैन, 50,000 रु.कि.चे चार सोन्याच्या अंगठया, 5,000 रु.कि.चे अंदाजे एक 3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे टॉप 60,000 रु.कि.चे सोन्याचे घंटण, 2,000 रु.कि.ची सोन्याची नथ, 1,000 रु.कि.ची चांदीची जोडवी, 

1,500 रु.कि.ची. चांदीचा करंडक, 8,000 रु.कि.चा अंदाजे सोन्याचे 4 मणी व 2 वाट्या,3,500 रु.रोख रक्कम अशी एकूण 1,63,000 रु.कि.चे वरील वर्णनाचे सोन्याचे,चांदीचे दागिने, रोख रक्कम लंपास केली आहे.

सदर घटनेबाबत फिर्यादी प्रशांत अश्विनीकुमार मोरे यांनी आटपाडी पोलिसात अज्ञात चोरट्या विरुद्ध फिर्याद दिली असून सदर घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments