नीलकंठ शिंदे यांची नेपाळ, भूतान, बांगलादेश सद्भावना सायकल
यात्रा आंतरराष्ट्रीय युवा संमेलनासाठी सायकलिंग करत ढाक्यात उपस्थित राहणार
सांगोला (प्रतिनिधी)( शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे)
लोकांमध्ये शांती व सद्भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने स्नेहालय अहमदनगरचे डॉ गिरीश कुलकर्णी यांनी आयोजित केलेल्या सद्भावना सायकल रॅलीत नीलकंठ शिंदे सर सहभागी झालेले आहेत
नीलकंठ शिंदे सर यांची सोलापूर जिल्ह्यातून जागतिक सद्भावना शांतता सायकल रॅलीकरिता निवड झालेली आहे. आंतरराष्ट्रीय युवा संमेलन व चर्चासत्र दिनांक 29 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर पर्यंत बांगलादेश मधील ढाका
या शहरात आयोजित करण्यात आलेले आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेत जगभरातील नामवंत शास्त्रज्ञ ,डॉक्टर, समाजसेवक त्याचबरोबर विविध स्तरातून मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यापूर्वी त्यांनी सांगोला ते कन्याकुमारी, पंढरपूर ते घुमान (पंजाब )3500 किलोमीटर सायकल यात्रा करत शांतता व एकतेचा संदेश दिलेला आहे. आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत त्यांनी गतवर्षी काश्मीर ते कन्याकुमारी सायकल यात्रा यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे. जगातील सर्वात खडतर सायकल यात्रा मनाली ते लेहहि पूर्ण केलेली आहे.
बांगलादेश, नेपाळ ,भूतान या सायकल रॅली सबंध देश व परदेशातील प्रत्येक राज्यातून सायकलिस्ट सहभागी होत आहेत.
चौकट:-
सद्भावना सायकल रॅलीत सोलापूर जिल्ह्याच्या वतीने सहभागी होण्याचा मान मिळत आहे त्याचबरोबर नेपाळ ,भूतान, बांगलादेश या देशातील शहरांमध्ये सद्भाभावनेची जागरूकता ,पथनाट्य , विविध संदेश घेऊन निघालेलो आहोत. बांगलादेशची राजधानी येथे 2 ऑक्टोंबर राष्ट्रपिता
महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त जागतिक युवा संमेलनाचे आयोजन केलेले आहे या चर्चासत्रामध्ये सहभागी होण्याकरिता आम्ही सायकल प्रवास दिनांक 10 सप्टेंबर पासून सुरू केलेला आहे त्याचा समारोप गांधी जयंती दिवशी ढाक्यात होणार आहे. यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावरील वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.
श्री नीलकंठ शिंदे, सर सांगोला



0 Comments