google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यात.. संगेवाडी, सांगोला, नाझरा, हातीद आणि सोनंद या मंडलला वगळले कृषी विभागाचा अहवाल आमच्या मंडल मध्ये पाऊस पडला आहे तर आमच्या गावात पाणी टंचाई कशी शेतकऱ्यांचा टाहो

Breaking News

सांगोला तालुक्यात.. संगेवाडी, सांगोला, नाझरा, हातीद आणि सोनंद या मंडलला वगळले कृषी विभागाचा अहवाल आमच्या मंडल मध्ये पाऊस पडला आहे तर आमच्या गावात पाणी टंचाई कशी शेतकऱ्यांचा टाहो

 सांगोला तालुक्यात.. संगेवाडी, सांगोला, नाझरा, हातीद आणि सोनंद या मंडलला वगळले कृषी विभागाचा अहवाल


आमच्या मंडल मध्ये पाऊस पडला आहे तर आमच्या गावात पाणी टंचाई कशी शेतकऱ्यांचा टाहो

 सांगोला :-(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला )

सलग २१ दिवस पावसाचा खंड असलेल्या एकुण ५ मंडळामध्ये ५०% पेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकचा सर्वे करून त्यांना नुकसानापोटी आगाऊ २५ टक्के रक्कम देण्यासाठी शासनाकडून सर्वेक्षण सुरू आहे. यामध्ये महूद, शिवणे, जवळा, कोळा व घेरडी या मंडल चा समावेश करण्यात आला आहे.

 तर पेरणीपूर्वी व पेरणीनंतर आधी मधी पाऊस पडल्याचे कारण पुढे करीत, संगेवाडी, सांगोला, नाझरा, हातीद आणि सोनंद हे मंडल वगळण्यात आले आहेत.यामुळे तालुक्यातील इतर पाच मंडळ मधील सर्व शेतकऱ्यांवर हा सरासर अन्याय असल्याची भावना या परिसरातील शेतकऱ्यांमधून व्यक्त होत असून,

 निसर्गाच्या लहरीपणामुळे १०० मीटर अंतरावर पाऊस आहे, तर १०० मीटर अंतरावर पाऊस नाही अशी परिस्थिती असताना, शासनाने हा निकष कोणत्या आधारे लावला असा संतप्त सवाल करीत तालुक्यातील सर्वच मंडळांचा यामध्ये सहभाग करावा अशी आक्रमक मागणी वगळण्यात आलेल्या मंडळातील शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे.

हंगामामध्ये प्रतिकूल परिस्थिती या नुसार १५ जुलै नंतर ज्या मंडळामध्ये पेरणीपूर्वी पंधरा दिवसांनी व पेरणी नंतर पंधरा दिवस पावसाचा खंड पडला अर्थात सर्वसाधारण २१ दिवसाचा खंड पडल्यानंतर हंगामातील प्रतिकूलपरिस्थितीसाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ५% क्षेत्राचे सर्वेक्षण केले जाणार आहे.

 यामध्ये महूद, शिवणे, जवळा, कोळा व घेरडी या मंडल चा समावेश करण्यात आला आहे. कृषी विभागाच्या नियोजनानुसार सांगोला तालुक्यात सद्यपरिस्थितीला सर्वेक्षण सुरू करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु सांगोला तालुक्यात चालू वर्षी खरीप हंगामात पेरण्या करण्याइतपत पाऊस झाला नाही.

 शेतकऱ्यांनी कमी अधिक जमिनीच्या ओलीवर पेरण्या केल्या खरं परंतु, आज पेरणी केलेली काही पिके पाण्याअभावी करपू लागली आहेत. तर जमिनीतील ओलावा पुरेसा नसल्यामुळे बियाणे उगवलेच नाही. अशा परिस्थितीत शासनाकडून अनुदान रुपी आधार मिळेल अशी अपेक्षा लागून असताना, 

कृषी विभागाच्या अहवालानुसारतालुक्यातील काही मंडळ वगळण्यात आले आहेत. सदर वगळण्यात आलेल्या मंडळ मधील अनेक गावांमध्ये अद्यापही पाऊस झालेला नाही. हवामानाच्या लहरीपणामुळे एका गावात गावातील वाड्या वस्त्यावर पाऊस नाही अशी परिस्थिती पाऊस आहे 

तर त्याच असताना कृषी विभागाकडून हा निकष कोणत्या आधारे लावला आणि संपूर्ण ५ मंडळ या सर्वेक्षणामधून वगळण्यात आले. याला जबाबदार कोण? असे संतप्त भावना यानिमित्ताने शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.

सांगोला शहर आणि तालुक्यात आज अखेर दमदार पावसाचे आगमन झालेले नाही. तालुक्यातील प्रत्येक मंडळामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचापाऊस झाला आहे. परिणामी आज सर्वत्र पाणीटंचाई जाणवत असून, पाण्याच्या पातळ्यांनी तळ गाठला असल्याने तालुक्यातील काही भागांमध्ये टँकर द्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

 तालुक्यातील नागरिकांची तहान जीवन प्राधिकरण अर्थात शिरभावी पाणीपुरवठा योजनेवर आणि टँकरवर अवलंबून आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ही परिस्थिती असेल तर शेतातील पिकांची अवस्था काय असेल याचा विचार संबंधित कृषीविभागाने केलेला नाही. 

यामुळे तालुक्यातील पाच मंडळ वगळण्यात आले असल्याने, कार्यालयात बसून तालुक्याचा आढावा समजत नसतो. कृषी विभागाने अगोदर गावागावात जाऊन पिकांची पाहणी करावी. 

मगच आमचे मंडळ वगळावे याबाबत लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे अशी मागणी संगेवाडी, सांगोला, नाझरा, हातीद आणि सोनंद हे मंडल क्षेत्रातील शेतकऱ्यांमधून जोर धरत आहे.

चौकट

सांगोला तालुक्यात पाण्याची भयान परिस्थिती निर्माण झाल्याने, तालुक्यावर दुष्काळाचे परिस्थिती उद्भवण्याची चिन्हे आहेत. घरावरील पत्रा ओला होण्याइतपत देखील पाऊस झाला नाही. तर कृषी विभागाला पाऊस दिसला कुठून, शेतकन्यावर अन्याय कराल तर याद राखा शिवसेना कदापि सहन करणार नाही. तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये तीच परिस्थिती असून तालुक्यातील प्रत्येक मंडळाचा या योजनेमध्ये सहभाग करावा अन्यथा संबंधित कृषी विभागा विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू.

मा. हरिभाऊ  पाटील शिवसेना नेते (उध्दवबाळासाहेब ठाकरे शिवसेना)

Post a Comment

0 Comments