google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राज्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. डोळ्यादेखत पिके सुकत चालली आहेत.'त्या' मागणीवर शहाजी बापू पाटलांचा विरोधकांच्या सुरात सुर; म्हणाले...

Breaking News

राज्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. डोळ्यादेखत पिके सुकत चालली आहेत.'त्या' मागणीवर शहाजी बापू पाटलांचा विरोधकांच्या सुरात सुर; म्हणाले...

 राज्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. डोळ्यादेखत पिके सुकत चालली आहेत.


'त्या' मागणीवर शहाजी बापू पाटलांचा विरोधकांच्या सुरात सुर; म्हणाले...

 राज्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. डोळ्यादेखत पिके सुकत चालली असून खरीप हंगाम वाया जाण्याची भीती सतावत आहे.

 या पार्श्वभूमीवर विरोधकांनी राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी लावून धरली आहे. अशात, आता सत्ताधाऱ्यांतील आमदारानेही दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

'त्या' मागणीवर शहाजी बापू पाटलांचा विरोधकांच्या सुरात सुर; म्हणाले...
उजनी आणि नीरा नदीच्या पाण्यासाठी यावर अवलंबून असणारे शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी विविध ठिकाणी धरणे आंदोलन सुरू केले आहे. 

आज पंढरपूरमधील आंदोलनास आमदार शहाजी बापू पाटील यांनी भेट दिली आणि शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी शहाजी बापू पाटील यांनी १५ दिवसात सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

उजनी धरणावरील पुणे जिल्ह्यातील धरणात पाणी साठा आहे. पाच धरणातून उजनीत पाणी सोडून पुन्हा उजनी धरणातून १४ टीएमसी पाण्याचं एक आवर्तन करावे, अशी मागणीही पाटील यांनी केली आहे. लवकरच होणाऱ्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पाणी सोडण्यावरून मोठी खडाजंगी होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments