सांगोला तालुक्यात जनावरांच्या चारा छावण्या सुरू करण्यात याव्यात ,नीरा उजवा कालव्याचे
टेल टू हेड पाणी वाटप करण्यात यावे, तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात यावा रासपने दिले तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन
नायब तहसीलदार शुभांगी जाधव यांना निवेदन दिले
रासपने दिले तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन
प्रतिनिधी/ (सांगोला शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला)
सांगोला तालुक्यात जनावरांच्या चारा छावण्या सुरू करण्यात याव्यात ,नीरा उजवा कालव्याचे टेल टू हेड पाणी वाटप करण्यात यावे, तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात यावा ,तालुक्यातील सर्व तलाव ,बंधारे पाण्याने भरून देण्यात यावेत ,शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी, शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करण्यात यावी ,मागील चारा छावणीचे थकीत बिले तात्काळ देण्यात यावीत ,या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार शुभांगी जाधव यांना देण्यात आले ,हे निवेदन देतेवेळी रासप जिल्हा सरचिटणीस नवनाथ मदने ,अनिल शेंडगे, तालुकाध्यक्ष डॉक्टर संतोष लवटे, युवक अध्यक्ष आनंदराव मेटकरी ,संजय मोरे ,दिगंबर शेंडगे ,समाधान मोरे आदी उपस्थित होते. या मागण्या त्वरित मान्य कराव्यात अन्यथा रासपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही या दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.
0 Comments