भीषण अपघात..आटपाडी-बोराटमळा येथे एस.टी.च्या चाकाखाली सापडून एकजण जागीच ठार
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला )
आटपाडी तालुक्यातील भिंगेवाडी येथील बोराटमळा येथे एस.टी.च्या चाकाखाली सापडून एकजण जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी १०.३० च्या सुमारास घडली. अप्पासाहेब कुंडलिक चव्हाण (गेळे) (वय ८०) असे ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आटपाडी आगाराची एस.टी. आटपाडी-जुनोनी सकाळी ७.२५ वाजता आटपाडी बस स्थानक येथून निघाली होती. सदरची बस ही भिंगेवाडी बोराटमळा मार्गे.
बनपुरी, करगणी जुनोनी व पुन्हा जुनोनी, करगणी, बनपुरी, बोराटमळा, भिंगेवाडी असा बसचा प्रवाशी मार्ग आहे. सदरची बस सकाळी १०.३० च्या सुमारास बोराटमळा येथे आली असता, यावेळी एस.टी. मध्ये बसण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली आहे.
यावेळी अप्पासाहेब कुंडलिक चव्हाण हे बस मध्ये चढण्यासाठी येत होते. परंतु त्याचवेळी बस चालकाने बस सुरु करून पुढे जात असताना, बसच्या चाकाखाली अप्पासाहेब कुंडलिक चव्हाण (गेळे) आल्याने बसचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने या मध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. आटपाडी ग्रामीण रुग्णालय येथे त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.
0 Comments