सांगोला तालुक्यातील बामणी येथील ड्रॅगन फ्रूटचे
युवा उद्योजक बजरंग साळुंखे यांना राज्य शासनाचा वसंतराव नाईक पुरस्कार
सांगोला प्रतिनिधी (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे)
सांगोला तालुक्यातील बामणी येथील शेतकरी बजरंग साळुंखे यांना महाराष्ट्र शासनाचा शुक्रवारी वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्काराने कृषी मंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले
वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान पुसद च्या वतीने हरितक्रांतीचे प्रणेते महाराष्ट्र राज्याचे मा मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या 44व्या स्मृतिदिनी बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सुधाकर राव नाईक
पे प्रेक्षागृहात 20 आगस्ट रोजी वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते वसंतराव नाईक हे प्रगतशील शेतकरी कृषी शास्त्रज्ञ तसेच महाराष्ट्राचे प्रदीर्घ काळाचे बारा वर्षे मुख्यमंत्री होते त्यांचा जन्मदिवस हा महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.
महाराष्ट्राचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते बामणी येथील शेतकरी बजरंग सदाशिव साळुंखे यांना सन्मान चिन्ह शाल श्रीफळ प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले बजरंग साळुंखे हे बारा वर्षापासून ड्रॅगन पुढची लागवड करून सुमारे 26 एकरामध्ये मध्ये ड्रॅगन फूडची बाग लावली आहे.
आपल्या शेतात ड्रॅगन फ्रुट पिकाबाबत नवीन प्रयोग करून उत्पन्न वाढीसाठी निर्यातक्षम ड्रॅगन फ्रुट तयार करण्याचे काम केले त्याचबरोबर ड्रॅगन फ्रुटची नर्सरी तयार करून महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यातही ड्रॅगन फडची रोपे तयार करून विक्रीी करीत आहेत.
या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी माजी राज्यमंत्री एमपी हिराणी आमदार ऍडव्होकेट निलाय नाईक आमदार एडवोकेट इंद्रनील नाईक मा. आमदार अनंत कुमार पाटील माजी आमदार ख्वाजा बेग, आमदार राजेंद्र नजरधने कृषी भूषण दीपक असेगावकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते


0 Comments