google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आठ हजार सांगोलेकरांनी दिली समृद्ध महाराष्ट्रला भेट : चेतनसिंह केदार समृद्ध महाराष्ट्र प्रदर्शनाला उस्फूर्त प्रतिसाद, शुक्रवारी समारोप

Breaking News

आठ हजार सांगोलेकरांनी दिली समृद्ध महाराष्ट्रला भेट : चेतनसिंह केदार समृद्ध महाराष्ट्र प्रदर्शनाला उस्फूर्त प्रतिसाद, शुक्रवारी समारोप

 आठ हजार सांगोलेकरांनी दिली समृद्ध महाराष्ट्रला भेट : चेतनसिंह केदार


समृद्ध महाराष्ट्र प्रदर्शनाला उस्फूर्त प्रतिसाद, शुक्रवारी समारोप

सांगोला (प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे)

दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्या वतीने रामकृष्ण व्हिला येथे आयोजित केलेल्या समृद्ध महाराष्ट्र 2023 या प्रदर्शनाला सांगोलेकरांनी उस्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे. तालूक्यातील तब्बल आठ हजार सांगोलेकरांनी या प्रदर्शानात सहभागी होत केंद्र सरकारच्या विविध खात्यांची माहिती घेतली, अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी दिली.

माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या संकल्पनेतून आणि भाजपा जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारच्या विविध खात्याची माहिती ग्रामीण भागातील नागरिकांना व्हावी यासाठी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

 तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी सांगोला तालूक्यातील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थीनी व नागरिकांना सकाळ पासून भेट दिली. बांबू पासून बनविल्या गेलेल्या देव देवतांच्या आकर्षक मूर्ती पाहून नागरिक भारावून गेले. बांबू पासून बनणारे कानातील गळ्यातील मनमोहक दागिने हे अंचबित करणारे होते.

भारताच्या खान विभागाने प्रदर्शनात मांडलेले उत्खननात सापडलेले डायनासोरचे अवशेष, डायनासोरचे अंडे, पृथ्वीच्या भूगर्भातून उत्खननात सापडलेले मानवी उत्क्रांतीचे अवशेष, प्राचीन संस्कृतीच्या पाऊलखूणा सांगणाऱ्या वस्तू हे पाहून विद्यार्थी व विद्यार्थीनी भारावून गेले होते.

वखार महामंडळाच्या गोदामाची पद्धती, प्रकार व भारताच्या अन्नधान्य पुरवठा विभागाची यंत्रणा, खादी ग्रामोद्योगच्या विविध योजना याची प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांनी इंतभूत माहिती घेतली.दरम्यान शुक्रवारी सांयकाळी चार वाजता या प्रदर्शनाचा समारोप करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी दिली.

सरपंच , उपसरपंचानी घेतली ग्रामविकासाची सिद्धी या प्रदर्शनात सांगोला तालूक्यातील सरपंच व उपसरपंच यांनी सहभागी होत ग्राम विकासाच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या पायाभूत सुविधा गावाच्या विकासासाठी  कशा उपयोगात आणता येतील याची माहिती घेतली.

 भारत सरकारच्या जलशक्ती विभागाचे कार्य, उर्जा संवर्धन या सारख्या महत्वाच्या असलेल्या स्टॉलला भेटी देत योजनांची अधिकची माहिती घेतली. यावेळी प्रदर्शनाला भेट दिलेल्या सरपंच व उपसरपंच यांचा सांसा फाउंडेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला.

Post a Comment

0 Comments